पान:गद्यरत्नमाला.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
गद्यरत्नमाला

.

गल्या उद्योगाकडे लाविलें नाहीं तर भलत्याच व्यसनांकडे वळेल. दुर्गुणांचे मूळ आळस होय. प्रत्येक मनुष्यानें आपल्या अंगच्या दुर्गुणांच्या मूळाचा शोध केला तर त्यास आळसाशिवाय कांहीं सांपडणार नाहीं. अमुक वर्षी अमुक महिन्यांत अमुक दिवशीं अमुक घटकेस एकाद्याच्या हातून प्रथमतः वाईट गोष्ट घडली; त्याच वर्षी त्याच महिन्यांत त्याच दिवशीं त्याच घटकेस त्यास कांहीं तरी जरूररीचं काम असतें तर त्याच्या हातून अशी गोष्ट घडली नसती हैं उघड आहे. कर्ममार्गीचें बीज हेंच आहे असें शोधक विद्वानांचे मत आहे. कर्ममार्गीचे उद्देश दोन; एक पुण्यसा- धन आणि दुसरा पापनिवृत्ति. कित्येक कर्मों जीं व्यर्थ वाटतात, त्यांची पापनिवृत्त्यर्थं योजना आहे. देशांत संपत्ति फार असल्या- मुळे रिकामे लोक फार असतात. त्यांवरून आपल्या लोकांत एक म्हणही पडली आहे; एकानें मिळवावें आणि दहानी खावें. या रिकाम्या लोकांची सन्मार्गाकडे प्रवृत्ति व्हावी म्हणून कर्ममार्गाची योजना झाली.
 वर सांगितल्याप्रमाणें एकाद्या वेळीं फुरसत सांपडल्यामुळे पापवासना मनांत उत्पन्न होऊन भलतेंच पापकर्म हातून घडतें. तर नेहमीच जो आळशी त्याची व्यवस्था काय होईल ? त्यास शेंकडों दुर्व्यसनें जडतील, आणि त्याव्या अंगचे सद्गुणांचे बीज- सुद्धां भाजून टाकतील. आळसाचा एक परिणाम फार भयंकर आहे; तो हा कीं, त्याच्या योगानें दुर्व्यसनें लागून अनेक वाईट इच्छा अधिकाधिक उत्पन्न होऊं लागतात; व त्या मानानें इच्छा तृप्त करण्याची साधनें कमी होतात. उद्योगी मनुष्यास संपत्ति, योग्यता, सुख, यांची इच्छा झाली तर तो सत्कर्मानें उद्योग करून त्या वस्तु प्राप्त करून घेईल. आळशी मनु- ध्यासहि ह्याच इच्छा असतात, परंतु अंगीं पराक्रम नस- ल्यामुळे चांगल्या रीतीनें त्यास आपले काम करितां येत नाहीं. मग लबाडी, लुचेगिरी करून आपल्या इच्छा पुरवू पाहतो.