पान:गद्यरत्नमाला.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आळस.

१५९


ण्याचे श्रम केले पाहिजेत. शरीरशक्ति वाढवावयाची झटलें तरी व्यायामादि उपाय केले पाहिजेत. उगाच बसून कांहीं व्हावयाचें नाहीं. आळसाने शरीरास शैथिल्य येतें, त्याप्रमाणे मनाचाहि समंजसपणा कमी होऊन मोठा बुद्धिमान् मनुष्य अडाण्याप्रमाण असमंजस होतो. भिन्नभिन्न मनुष्यांमध्यें ज्ञानादिकांच्या संबंधानें न्यूनाधिकभाव पुष्कळ दिसतो, तथापि तो स्वतःच उत्पन्न झाला आहे असे नाहीं; तर त्याचें कारण असें आहे कीं, ज्यांनीं आ- पली ज्ञानशक्ति उद्योगानें वाढविली, ते विद्वान्, पंडित, या वि- शेषणांस पात्र झाले; व ज्यांनी आळसाच्या स्वाधीन होऊन अध्ययनाचा उद्योग केला नाहीं, ते तसेच राहिले. ईश्वरानें जी आपणांस वार्द्धशाक्त दिली आहे, ती आपण उद्योगानें वाढविणार नाहीं तर ती असून नसून सारखीच आहे. अंगीं नुसती बुद्धि असून उपयोग नाहीं. उद्योग करून जगांत ती उपयोगास आणली पाहिजे; नाहीं तर व्यर्थ. आजपर्यंत हजारों बुद्धिमान् पुरुष जन्मले असतील, त्यांस आळसानें घेरिलें नसतें तर तेहि इतरां- प्रमाणें नांवारूपास आले असते. पण काय उपयोग ? अरण्यांत एखादें सुंदर फूल फुलावें आणि जागच्या जागींच मावळून गलित व्हावें; त्याप्रमाणे लोकांत राहून त्यांची अवस्था झाली.
 दिवसेंदिवस मनुष्याची स्थिति चांगली व्हावी तसें न होता आळशी मनुष्याच्या सर्व गोष्टी बिघडूं लागतात. लोकांत त्याची कोणी पर्वा करीत नाहीं. वाडवडिलांचें कांहीं द्रव्य जवळ अस- ल्यास खर्चून जाते. एकंदर सर्व घोटाळा होतो. आळसापासून सुख आहे असें वाटलें तरी आळशी होऊं नये. निश्चलपणापा- सून कदाचित् क्षणभर सुख वाटत असेल, परंतु त्यापासून परि- नाम फार वाईट होतात. आळसाच्या योगानें मनुष्याची सुधा- रणा होत नाहीं. इतकेंच नव्हे, तर त्यापासून उलटे त्याच्या अंगीं अनेक दुर्गुण जडतात. स्वभावतःच मनुष्याचें मन कधीं स्थिर रहात नाहीं. त्यास काहीं तरी व्यवसाय पाहिजे. तें चां-