पान:गद्यरत्नमाला.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुख आणि दुःख.

१५७


त्या वेळेस, पूर्वी दुःख होतें असें नाहीं. पहा, अशा उदासीन मनः- स्थितींत, जर आपण एकाएकीं, सुस्वर गायन किंवा वाद्य ऐ किलें; अथवा एकादें सुंदर चित्र पाहिलें, किंवा चकचकीत पा निदार रंगाची वस्तु पाहिली, अथवा, गुलाबी अत्तराचा सुंगध घेतला, अथवा एकाएकीं श्रीखंडासारखा एकादा उत्तम पदार्थ खाल्ला तर पूर्वोक्त ऐकणें, दास घेणें, रुचि घेणे या सर्वांपासून आपणास सुख होते यांत संशय नाहीं; तथापि, विचार करून पाहतां, हैं सुख होण्यापूर्वी, आपणास कांहीं दुःख होतें असें म्हणतां येणार नाहीं. व तसंच, हें सुख बंद होण्याबरोबर, एकाद्या खरोखर दुःखास आरंभ होतो असाहि कोणाचा अनुभव नाहीं. त्याचप्रमाणे अशा उदासीन स्थितींत मनुष्यास एकाद्यानें अक स्मात् गुद्दे मारले अथवा काहीं कडू पदार्थ पाजला किंवा, ए- काएक कर्कश शब्द ऐकून त्याचे कांटाळे बसले, तर, त्या वेळेस त्याचें एकादें वास्तविक सुख कमी होतें असें नाहीं, तथापि त्या त्या इंद्रियास त्यापासून साक्षात् दुःख होतें यांत संशय नाहीं. आतां कोणी म्हणेल कीं, या दुःखाच्या पूर्वी सुद्धां सुख होतें पण तें फार सूक्ष्म असल्यामुळे त्याचा अनुभव येत नाहीं. परंतु दुःखामुळे ते अगदीं नाहींसे झाले तेव्हां त्याचा अभाव मात्र अनुभवास येतो. हें बोलणें सूक्ष्मतेविषयीं असेल परंतु अशी सूक्ष्म- ता सृष्टींत दिसत नाहीं. कारण सुखाच्या रूपानें ज्याचा अनुभव येतो त्यासच सुख म्हणणे योग्य आहे. व दुःखाविपयींहि तसेंच म्हटले पाहिजे. यावरून सुख व दुःख हीं अन्योन्याश्रित आहेत असें कधीं म्हणतां येणार नाहीं, तीं दोन्हीं भावरूप असून परस्प रनिरपेक्ष आहेत. सुख व दुःख, या दोघांचा अभाव म्हणजे उदासीनता, हे तीन्ही पदार्थ अगदी वेगळे आहेत हें स्पष्ट आहे. यांतून कोणतेंहि एक दुसऱ्याच्या संबंधाशिवाय जाणतां येतें. समजा, रामाचें पोट दुखूं लागलें, तेव्हां अर्थात् तो दुःखांत आहे, इतक्यांत त्यास डाग दिला, तर त्यास अधिक दुःख