.
तील यांत संशय नाहीं. ज्यांस या लिहिण्याचा संशय वाटेल त्यांनीं बर्क् साहेबाचे ग्रंथ लक्षपूर्वक वाचिले तर त्यांचीहि या- विषयी खात्री होईल.
एमंद् बर्क मोठा तत्त्वज्ञानी होता. त्याचे विचार फार खोल आहेत. त्यानें भव्य आणि सुंदर या विषयावर एक ग्रंथ लिहिला आहे, तो फार उत्तम आहे. या ग्रन्थांतील एक लहा- नसा उतारा मासल्याकरितां या लेखापुढे दिला आहे. याशिवाय इतिहास, राजनीति, इत्यादि विषयांवर त्याचे अनेक अत्युत्तम ग्रन्थ आहेत.
नवीन पदार्थ दृष्टीस पडले म्हणजे मनुष्यांच्या चित्तवृत्ति चलित होतात, यास कारण त्यांची नवीनता हेंच केवळ म्हणतां "येत नाहीं. तर, प्रौढ मनुष्यांच्या मनांत सुद्धां, नवीन पदार्थ पाहून, रागद्वेषादि मनोभाव उत्पन्न होतात, यास्तव, सुख किंवा दुःख उत्पन्न करण्यासारखा, नवीनतेशिवाय पदार्थाच्या अंगीं दुसरा कांहींतरी गुण अवश्य कल्पिला पाहिजे. सुख आणि दुःख हे दोन पदार्थ सर्वास ठाऊक आहेत, असें आहे तरी त्यांचे लक्षण करणे अशक्य आहे. मनुष्यांस सुखदुःखाचा अनु- भव वास्तविक होत असेल यांत संशय नाहीं. तथापि, सुखदुःख यांस नांवे देण्यांत ते बहुत चुका करतात, व त्याचें कारणहि भ- लतेच सांगतात. कित्येकांचे असे मत आहे कीं, सुखाभाव हेंच दुःख व त्याचप्रमाणे दुःखाभाव हैं सुख होय. वस्तुतः सूक्ष्म वि चार केला असतां असें दिसतें कीं, सुखदुःखें अन्योन्यसापेक्ष नाहींत तर प्रत्येकास स्वातंत्र्यानें अस्तित्व आहे. स्वभावतः मनु- याचें मन सुखी नाहीं व दुःखीहि नाहीं, तर उदासीन आहे असें दिसतें. अशा मनःस्थितीस उदासीनता असें म्हणतात. जेव्हां मनाची उदासीनता नाहींशी होऊन खरोखर सुख होऊ लागतें,