पान:गद्यरत्नमाला.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
गद्यरत्नमाला

.

पिलीं. सन १७८९ दांत यानें कालिदासकृत शाकुंतल नाटकाचें इंग्रजी भाषांतर केलें. याचा विद्याभ्यास नेहमीं सुरू होता. परंतु १७९४ वांत याच्या पोटांत रोग झाला. त्यापासून तो तारीख १७ एप्रिल रोजी याच वर्षी मरण पावला.
 सर विल्यम जोन्स याच्या वयाचा व विद्येचा विचार करूं लागले म्हणचे मोठा अचंबा वाटतो. असे विद्येविषयीं तत्पर पु- रुष जगांत फारच विरळा सांपडतात. याने स्वभाषेत बन्याच कविता केलेल्या आहेत त्यांपैकीं कांहीं फारच मनोवेधक आहेत. तो जसा मोठा विद्वान् होता, तसा मोठा नीतिमानहि होता. ' राज्य म्हणजे काय, ' या नांवाची एक त्याने लहानशी कविता केली आहे. तींत त्यानें असें म्हटलें आहे कीं, " मोठाले किल्ले, कोट, खंदक असल्यानें राज्य चांगले होत नाहीं. तसेंच मोठा- र्ली शहरें, बंदरें, आरमारें, राजवाडे, असले म्हणजे राज्य चांगलें झालें असें नाहीं. फार काय, पण केवळ बुद्धिमान मनु- ध्यांनी सुद्धां राज्य चांगले होत नाही, तर आपले कर्तव्य व हक्क जाणून त्यांप्रमाणे वागणारे मनुष्य ज्या राज्यांत असतात, तेंच चांगलें राज्य होय."
 जोन्स साहेब नेहमीं निःपक्षपाताने न्याय करी. ज्या लोकांचा आपण न्याय करतों, त्यांचे जुने कायदेकानू, रीतिभाती वगैरे यांची पूर्ण माहिती न्याय बरोबर होण्यास अत्यंत आवश्यक आहे, असें जाणून मनुस्मृति वगैरे पुष्कळ जुन्या ग्रंथांचे इंग्रजी- मध्ये त्याने भाषांतर केलें. पूर्वी हिंदुस्थानांत साहेब लोक येत, ते हिंदु लोकांत विद्येचा प्रसार नाहीं, असें यूरोपांत प्रसिद्ध करीत. ग्रीक, लातिन, या जुन्या भाषांप्रमाणे संस्कृत भाषा सुधारलेली आहे, असें पूर्वी यूरोपांतील लोकांस माहीत नव्हतें जोन्स साहेबाने शाकुंतल नाटकाचें भाषांतर केल्यामुळें संस्कृत ग्रंथां कडे युरोपियन विद्वानांचें लक्ष लागलें. शाकुंतल नाटकाचें भाषांतर हल्लीं यूरोपांतील सर्व भाषांत झाले आहे. हिंदु व