पान:गद्यरत्नमाला.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर विल्यम जोन्स.

१४९


ण्यासारखें भाषांतर करण्याचें कामहि मोठें कठिण होतें. परंतु हैं काम करण्यास योग्य मनुष्य इंग्लंदांत नाहीं ह्मणून तें काम राजानें फ्रान्स देशांत पाठविलें; अशी अप्रतिष्ठा होऊं नये ह्मणून त्यानें तें काम स्वीकारून मोठ्या श्रमानें एका वर्षात सर्व पुस्त• काचें भाषांतर तयार केलें. तें राजास मान्य होऊन त्याने जोन्स यास डेन्मार्कची राजधानी 'कोपेनहेगेन' येथल्या 'रायल सोसा- यटी' नामक सभेचा सभासद नेमिलें.
 पुनः सन १७७० रांत यानें यूरोपखडांत प्रवास केला. या वेळेस त्यानें पुष्कळ भाषा शिकून गणित वगैरे विषयांचाहि चां गला अभ्यास केला. पुढे लंडनास परत आल्यावर यानें काय- द्याचा अभ्यास केला. सन १७८३ या वर्षी त्याची कलकत्ता येथील सदर कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाच्या जाग्यावर नेमणूक झाली. एशिया खंडांतील देश पाहून तिकडील जुन्या भाषा शिकण्याची यास फार हौस होती, ती पूर्ण होण्याची सहज संधि आल्यामुळे तो मोठ्या आनंदानें कलकत्त्यास आला. या वेळेस वारन हेस्टिंग्स हा गवरनर जनरल होता. त्याच्या मदतीनें सन १७८४ या सालांत बंगाल्यांत 'एशियाटिक सोसायटी' ह्मणून एक मंडळी स्थापित झाली. जोन्स याची विद्वत्ता पाहून या मंडळीनें त्यास अध्यक्ष नेमिलें, या मंडळीपासून हिंदुस्थानचें पुष्कळ हित झाले आहे. जुने लेख, प्राचीन ग्रंथ, प्राचीन इति- हास, यांचा जो शोध लागला आहे, त्यास मुख्यत्वेकरून या मंडळीचे श्रम कारण होत. याच वर्षी जोन्स साहेब ब्राह्मणांच्या विद्येचें जें आद्यपीठ काशीक्षेत्र तें पाहण्यास मोठ्या उत्सुकतेनें गेला. नंतर त्यानें दोन वर्षे अभ्यास करून संस्कृत भाषेचें चांगलें ज्ञान संपादिले. सन १७८५ या वर्षी 'एशियाटिक मिसलनी' या नांवाचें दुसरें एक मासिकपुस्तक कलकत्ता येथे निघू लागलें. त्यांत जोन्स साहेब पुष्कळ मजकूर लिहीत असे. त्या पुस्तकांत फारसी भाषेतील कितीएक कवितेची इंग्रजी भाषांतरे यानें छा