पान:गद्यरत्नमाला.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर विल्यम जोन्स

.

१५१


ग्रीक यांच्या पौराणिक व ऐतिहासिक कथेंत सादृश्य आहे, असे प्रथम जोन्स साहेबास समजलें ग्रीकइतिहासकर्त्यानीं ' सांड्रकोट्स् ' ह्मणून हिंदुस्थानचा राजा होता, असे लिहिलें आहे, तो हिंदुस्थानांतला चंद्रगुप्त होय असे यानें ठरविलें. ही गोष्ट हल्लीं सर्वानुमतें अशीच ठरली आहे. संस्कृत भाषेस हल्लीं जो एवढा मान यूरोपखंडांत मिळाला आहे, त्यास कांहीं अंशीं सर विल्यम् जोन्स कारण आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं. सांप्रत यूरोपांतील विद्वान् लोक दहा दहा वीस वीस वर्षे संस्कृत भाषेच्या अभ्यासांत घालवितात.
 सर विल्यम् जोन्स यास एकंदर २८ भाषा येत होत्या असें ह्मणतात, त्या भाषा येणेंप्रमाणेंः-- १ इंग्रजी. २ लातिन. ३ ग्रीक. ४ फ्रेंच. ५ इतालिन. ६ आरबी. ७ फारसी. ८ संस्कृत ९ स्पानिश. १० पोर्तुगीज. ११ जर्मन. १२ रुनिक. १३ हिब्रू. १४ बंगाली. १५ हिंदी. १६ तुर्की १७ तिबेटी. १८ पाली. १९ पेल्हवी. २० देरी. २१ रशियन. २२ सिरिआक. २३ इथिओपिक. २४ कापतिक्. २५ वेल्श. २६ स्वीडिश. २७ डच २८ चिनी.
 यांपैकी पहिल्या आठ त्यास उत्तम विद्वानांप्रमाणें येत असत दुसन्या आठ मध्यम येत असत. बाकीच्या बारांत त्याचा थोडाबहुत प्रवेश मात्र होता.
 इंग्रजी लिपी आपल्या बालबोध लिपीप्रमाणें सुलभ नाहीं, तींतील कित्येक अक्षरांचे तीन चार उच्चार होतात, व कित्येक उच्चारांस एकापेक्षा अधिक अक्षरें आहेत, असा घोंटाळा अस ल्यामुळे प्रत्येक साहेब मनास मानेल त्या रीतीनें इकडले शब्द लिही, त्यावरून वाचणाराहि आपणास वाटेल त्याप्रमाणें उच्चार करी. असा गोंधळ होऊं नये ह्मणून संस्कृत लिपीच्या अमुक वर्णाबद्दल इंग्रजी लिपीतला अमुकच वर्ण लिहावा, असें जोन्स साहेबाने ठरविलें. ती रीत सर्वोस मान्य होऊन तीप्रमाणें मोठ-