पान:गद्यरत्नमाला.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
गद्यरत्नमाला

.

पाहिजे. हिंदुस्थानच्या राजांशी तह करणे, लढाई करणे बगैरे साक्षात् राज्यप्रकरणांशीं संबंध नसल्यामुळे इतिहासांत याचें नांव फार गाजलें नाहीं; तथापि अशा पुरुषाचें चरित्र मोठे उ पदेशपर असतें, याकरितां त्याचा वृत्तान्त संक्षेपाने लिहिला आहे.
 हा लंदन शहरांत सन १७४६ त जन्मला. त्याचा बाप गणितशास्त्रामध्ये हुशार असून सर ऐझाक् न्यूतन् गणितशास्त्रज्ञ. शिरोमणि याचा मित्र होता. जोन्स तीन वर्षांचा होण्यापूर्वीच त्याचा बाप मृत्यु पावला. त्याची आईहि मोठी सद्गुणी असून, गणितशास्त्र, नकाशे वगैरे काढणे, यांत हुशार होती. तिन मुलास बालपणापासून विद्येची अभिरुाचे लाविली. स्वतः ती त्यास शिकवीत असे,
 जोन्स याची पाठ करण्याची शक्ति फार मोठी होती. तो शाळेत असतां शेक्स्पियर या कवीचीं नाटकें पाठ ह्मणे, शाळेत असतांच तो लातीन, ग्रीक, आरबी व हिब्रू, या भाषा शिकला, त्याने आपल्या एकविसाव्या वर्षीच एशिया खंडांतील कवितांवर टीका लिहिल्या. इंग्लंदांत अशी चाल आहे कीं, यूरोपखंडांतील प्राचीनकाळ व सांप्रतकाळीं सुधारलेल्या देशांत प्रवास करून आल्याशिवाय विद्या पुरी झाली असें समजत नाहींत. अध्ययन संपल्यावर बहुशः सर्व विद्वान् लोक यूरोपखंडांतले देश पाहून येतात. कित्येक बुद्धिमान असतात ते त्या देशांची वर्णने लिहितात. व तेथें असतां त्या देशांतल्या भाषा शिकतात. या चालीप्रमाणे जोन्स साहेब सन १७६७ त युरोपखंडांतले देश पाहण्यास गेला; तेव्हां त्यानें जर्मन भाषेचा अभ्यास केला. पुढ ल्या वर्षी तो इंग्लंदांत परत आला. त्या वेळेस इंग्लंदांत देन- मार्कचा राजा आला होता. त्याजवळ फारशी भाषेत हातानें लिहिलेलें नादीरशहाचें चरित्र होतें, त्याचा त्यास फ्रेंच भाषेत तरजुमा करावयाचा होता, तें काम जोन्स यानें पतकरिलें. यांत त्यास मोठासा नफा नव्हता, व फ्रेंच भाषेत राजास पसंत पड