पान:गद्यरत्नमाला.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जेनाथन स्विफ्त.


लोकांनीं चांगलें ह्मणावें ह्मणून हा भक्तचिं ढोंग करतो, पण हा ईश्वरास मुळींच भीत नाहीं.'
 'शांतता करण्याकरितां लढाई करणें योग्य आहे, त्याप्रमाणें खरे कळविण्यांत मात्र वाद करणें वाजवी आहे. परंतु पारधी शिकारीस कोंडतात त्याप्रमाणें वाद करणारे बहुशः खरें दाबून डाकितात.'

( तुटे वादसंवाद तो हीतकारी - रामदास . )


 'बेवारशी मालावर सर्व हक्क सांगतात, त्याप्रमाणें धर्म. शास्त्राचे आहे. वादाचे वेळेस उभय पक्षांकडील लोक आपणास अनुकूल असा त्या वचनाचा अर्थ करतात.
 'जो नेहमी लोकांच्या खोड्या काढतो तो दिवसेंदिवस नासत जातो.
 'लोकांपासून गमत्या ह्मणून घेण्याची इच्छा करणें, झणजे मूर्खपणा करण्यास मोकळीक मागणें आहे.'
 'कोणी मनुष्य अप्रबुद्ध आहे किंवा व्यंग आहे, झणून त्यास मनुष्यांनीं हसूं नये. कारण, ह्या न्यूनता त्यास घालवितां यावयाच्या नाहींत.
 'जो दरिद्री मनुष्य कृतघ्न असतो, तो श्रीमंत झाला तर तसाच उदार होतो.
 जो मनुष्य खोटे बोलतो, तो आपल्या डोक्यावर मोठें ओझें घेतो. कारण लबाडी झांकण्याकरितां त्यास आणखी पंच. वीस लबाड्यांची योजना करावी लागते.'
 'गरज पडेल तेव्हां क्षणांत शिकूं, असें ह्मणून कित्येक लोक कांहींच शिकत नाहींत.
 'संसारांत गर्व वाहणें हें नदीच्या पुरासारखें आहे. नदीचा पूर वाहून जातो. तसा पुष्कळ गोष्टींनीं आपला गर्व नाहींसा होतो, आणि तो पुराप्रमाणे पुन्हा येतो.'
 'शहाणपणाची कृत्ये करणारे पुष्कळ सांपडतील. लुच्चेगि