पान:गद्यरत्नमाला.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
गद्यरत्नमाला.


 मनुष्यास जितकें शहाणपण कमी, तितका त्यास गर्व जास्त असतो. ' भर्तृहरीचंहि असेच एक वाक्य आहे.
 'एकंदरीने नम्रतेपासून फार फायदा आहे. जो मनुष्य फुका डौल घालून ढोंग माजवितो, त्यास तें चालविण्याकरितां नेहमी श्रम करावे लागतात. आपणांमध्ये शहाणपण असलें तर नम्र- तेच्या योगानें तें अधिक दिसतें. नम्रतेच्या योगानें आपलें आ- ज्ञान लोकांस दिसत नाहीं. नम्रतेच्या योगानें कसवीण लोकांस गत दिसते, त्याप्रमाणे नम्र मनुष्य लोकांस शहाणा दिसतो.'
 ज्या गोष्टी लोकांनी केल्या असतां आपण वाईट हाणतों, त्या आपण करणें ह्मणजे लोकांपेक्षां आम्ही मूर्ख आहों, असें कबूल करणेंच आहे.
 'आपली चूक पदरांत घेण्यास मनुष्याने कधी लाजूं नये. चूक कबूल करणें ह्मणजे कालच्यापेक्षां मी आज अधिक शहाणा झालों असें ह्मणणे आहे.
 'कामक्रोधादि मनोविकार आरंभी मनुष्यास अधिक बळकट करतात, पण परिणामी शक्तिहीन करतात. '
  रागावणे हाणजे दुसन्याच्या गुन्ह्याकरितां आपण शिक्षा भोगणे आहे.
 शूर मनुष्य इतरांस हलके मानितो, कारण, सूड घेण्याचें सामर्थ्य असून त्यांच्या अपराधांची क्षमा करून मी मोठा आहें, असे दाखविण्याचें त्याच्या हातीं आहे.
 'दुःखिताचें दुःख निवारण करणे यासारखं मनुष्यास कारतां येईल असें दुसरें महत्कृत्य नाहीं. याच्या योगाने ईश्वराचें काम केल्याप्रमाणेच होते.
 'नास्तिक मनुष्य मूर्ख होय. तो मूर्खपणानें देवाची निंदा करतो, परंतु ढोंगी मनुष्य देवाची आणि धर्माची समजून उम- जून थट्टा करतो. एकादा लुच्चा कर्जदार आपल्या धनकोस गोड गोष्टी सांगतो, पण त्याचा पैसा देत नाहीं. त्याप्रमाणें लो-