रीची कामे करणारे त्यांपेक्षां फार सांपडतील, पण उदार कृत्यें करणारे जगांत फारच थोडे आहेत. '
'सौन्दर्याकरितां स्त्रीवर प्रीति करणे, म्हणजे पैशाकरितां श्री- मंत मनुष्याशीं स्नेह करण्यासारखे आहे.'
मानवी पशु इतर पशूंप्रमाणे संसाराचे जाळ्यांत सांपडतात आणि इंद्रियांचे स्वाधीन होऊन आपला नाश करून घेतात.
'मनुष्य जितका अधिक वर्षे वांचेल तितका त्यास ईश्वराचा मोठेपणा व माणसांचा हलकेपणा अधिक कळेल. '
'मनमिळाऊ होण्यास सभ्यपणा आणि लुच्चेगिरी हीं दोन्हीं अंगी असावी लागतात.'
'कोणीहि आपले मत सांगितलें तरी आपला त्यास रुकार देणें हा बुद्धिमान् व शहाणा हालवून घेण्याचा सोपा मार्ग आहे.'
'जे बायकांमध्ये गुण तेच पुरुषांचे अंगीं दोप होतात. फार चांगल्या बायकोचे गुण पुरुषांमध्ये असले तर त्यांस नादान ह्मणतील,'
जे आपल्या हिताकरितां दुसऱ्यांस नेहमीं पीडा देतात, तिलप्राय उपकारास देखील पात्र नसतात, ते नेहमी आपल्या नफ्याकरितां दुसन्यांची आर्जवें करून त्यांस त्रास देतात.
‘खोटें करण्यापेक्षां खोट्याची क्षमा करणें हें फार वाईट व भयंकर होय. कारण, यामुळें लबाडी वाढते.
'सर्व लोक कृतघ्नतेची निंदा करतात. वस्तुतः कृतघ्नते- पेक्षां गर्वाची निंदा करणें योग्य आहे. कृतघ्न होईल. परंतु जगांत बहुशः मोठाच शठ असेल तो अशी चाल असते कीं, प्रत्येक दुसऱ्याचें हित करणान्यास असें वाटतें कीं, मी त्याच्या योग्यतेपेक्षा जास्त केलें. तसेंच प्रत्येक हित करून घेणारास असें वाटतें कीं, माझ्या योग्यतेपेक्षां याने मला कमी दिलें. '
'फार गोड फळास पक्षी फार टोंचतात, त्याप्रमाणें फार चांगल्या मनुष्यास लुच्चांपासून फार पीडा होते.'