पान:गद्यरत्नमाला.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जोनाथन स्विफ्त.

१४३


उपयोगी पडतात. एके समयीं असें झालें कीं, इंग्लंदच्या प्रधानांनी ऐलेदांत एक प्रकारचें नाणे पाडण्यास एका मनुष्यास परवानगी दिली. या नाण्यापासून ऐरिश लोकांचा फार तोटा होता; हें पाहून स्विफ्त साहेबाने एका वर्तमानपत्रांत बिननांवी कांहीं पत्र छापिली. या पत्रांत नवीन नाण्यापासून फार अन्याय होणार आहेत, व ऐरिश लोकांचा फार तोटा आहे, असें यानें सिद्ध करून दाखविलें, त्यामुळे इंग्लंदांत इतका गवगवा झाला कीं, प्रधानांनी नाणें पाडण्यास दिलेला हुकूम रद्द केला. या पत्रांचा इंग्लंदांतील प्रधानांस इतका राग आला होता कीं, त्यांनीं हीं पत्रे लिहिणाऱ्यास धरून देणान्यास मोठें बक्षीस मिळेल, असा जाहिनामा लाविला. हीं पत्रे स्विफ्त साहेबानें लिहिलीं आहेत, असें ऐलंदांत पुष्कळांस माहीत होतें, परंतु त्यास कोणी धरून दिलें नाहीं. हा ऐर्लेदांत इतका लोकप्रिय झाला कीं, त्यास मरेपर्यंत ऐर्लेदचा हितकर्ता असे सर्व ऐरिश लोक मानीत होते. कोणतीहि सार्वजनिक गोष्ट ऐलेदांत त्याच्या अनुमता- शिवाय होत नसे. 'गलिवरचा प्रवास' ह्मणून यानें एक क ल्पित ग्रंथ लिहिला आहे; त्यांत इंग्लंदांतील राजकीय व इतर प्रकरणी अन्याय उत्तम रीतीनें अन्योक्तीनें वर्णिलेले आहेत.
 स्विफ्त साहेबाने कांहीं स्फुट वाक्यें लिहिली आहेत, ती फार चांगली आहेत, त्यापैकीं कांहींचें भाषांतर येथे लिहिलें आहे.
 तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगून मूत्रीचें मन सुधारणें ह्मणजे वस्तयानें लांकडांचे ओंडे तोडण्यासारखे आहे. ' आपल्या देशांतील विद्वान् भर्तृहरि याचीं अशा अर्थाचीं बहुत वचनें आहेत.
 साधारण शहाणपण जसें जगांत उपयोगी पडतें, तसें तत्त्व- ज्ञान उपयोगी पडत नाहीं. जसें नेहमीं सोनें खिशांत बाळग- जायचा खुद्यीकरितां ठिकठिकाणी खोळंबा होतो.
' ' विद्या ही पायाप्रमाणें आहे. पाण्याप्रमाणें ती कुशलाच्या हातांत असली तर हित करील; नाहीं तर उलटा नाश करील.