पान:गद्यरत्नमाला.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
गद्यरत्नमाला.

एकसारखा तूं रडला असशील ? पाहिजे तसें बडबडावें, नाचावें, धांवावें, वगैरे तुझ्या बालपणच्या चेष्टांपासून तिला किती त्रास झाला असेल ? तुला दुखणे येई तेव्हां तिला किती वाईट वाटले असेल ? किती काळजी करावी लागली असेल ? किती त्रास भो गावा लागला असेल ? या व इतर गोष्टींमुळे मुलांनीं कृतज्ञ होऊन मातापितरांवर प्रीति करणें हें त्यांचे कर्तव्यकर्म आहे. असे सर्व लोक मानितात. ज्याच्या मनांत भक्ति नाहीं, त्यानें बाह्योपचारानें मोठी पूजा केली तरी ती जशी ईश्वरास ग्राह्य होत नाहीं, त्याप्रमाणेंच जो पुत्र आईबापांवर प्रीति करीत नाहीं, त्याच्या हातून कोणतेंच सत्कृत्य व्हावयाचें नाहीं. त्याचें निःपक्ष• पाती व न्याय्य असें आचरण असणार नाहीं. ह्याकरितां मुला, शहाणा असशील तर रागानें आईला कडू भाषण बोलल्याबद्दल ईश्वराची प्रार्थना करून त्याची क्षमा माग. तूं आईचा असा अपमान करतोस हैं लोकांस कळू देऊ नको. कारण, त्यापासून तुझा दुलौकिक होईल. अशा आचरणानें कोणी तुझ्याशी मैत्री करणार नाहीं. तूं आपल्या आईबापांशी देखील कृतघ्नपणाने वाग. तोस; असें कळलें तर तुजवर ममता कोण करील ? कारण तु- झ्याशीं मित्रत्व केल्यानें अथवा तुझ्या उपयोगी पडल्यानें आपलें हित आहे असें कोणासहि वाटणार नाहीं.

जोनाथन स्विफ्त.


 ख्रिस्ती शकाच्या सतराव्या शतकांत जोनाथन स्विफ्त नांवाचा मोठा ग्रंथकार इंग्लंदांत होऊन गेला. या ग्रंथकाराप्रमाणे लेखणीचें सामर्थ्य फारच थोड्यामध्ये असेल. उपरोधिक लिहिण्याच्या कामांत हा फार कुशल होता. धर्मसंबंधानें अथवा राजकीय संबंधानें मोठ्या मनुष्यांचे हातून राज्यांत जुलूम होऊ लागले झणजे गरीबांचें कांहीएक चालत नाहीं. अशा प्रसंगी राजा, प्रधान इत्यादिकांचे अपराध बाहेर काढण्यास उपरोधिक ग्रन्थ फार