पान:गद्यरत्नमाला.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
गद्यरत्नमाला

.

आहे. वास्तविक ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यांचा वाईटपणा दुसऱ्यांकडून कळला तर तो टाकू नये असें नाहीं. तसेच ज्या गोष्टींत कांहीं वाईट नाहीं, केवळ मतभेद मात्र आहे, त्या गोष्टी विनाकारण दुसऱ्या लोकांच्या नादी लागून टाकण्याची आवश्यकता नाहीं. त्या धरून चाललें तरी परकीय लोकांची अमर्यादा केली असें होत नाहीं. मर्यादा हा कुलीनपणाचा पाया होय. किंवा त्याचा अपरपर्याय आहे असें म्हटलें तरी चालेल.

कालव्यय.


 इहलोकीं सुखानें राहून मरणोत्तर स्वर्गास जावें अशी आपल्या अंगीं ज्यास योग्यता आणणे असेल, त्यानें व्यर्थ कालक्षेप न कर- ण्याविषयीं फार जपले पाहिजे. कालक्षेपासारखी दुसरी कोण- तीच हानि नाहीं. काल हें सुख आणि परलोक मिळविण्याचें भांडवल होय. त्याचा जो दुर्व्यय करील त्याचें दिवाळे वाज- ल्याशिवाय राहणार नाहीं. जन्मास येऊन मनुष्यास इहलोक आणि परलोक दोन्ही साधावयाचे आहेत; याकरितां दोहोंच्याहि प्राप्तीकडे कालाचा व्यय केला पाहिजे. सर्वकाल संसाराच्या काळजीत घालवून परलोकास विसरता कामा नये. संसारसुख भोगून शेवटीं परलोकसाधन करूं असें ह्मणून असंख्य लोक फसले आहेत. सुखाच्या ऐन भरांत असतांच कित्येकांस मृत्यूने गांठिलें. कित्येक झातारे झाले, परंतु हातारपणीं इंद्रियें विगलित होऊन सुखोपभोगासहि असमर्थ झाले. अशांच्या हातून परलोकसाधन कोटून होणार ? बालपणीं क्रीडा, तारुण्यांत विषय- सुख, वार्धक्यांत अशक्तता, असें होऊन असंख्यात लोकांनीं मनुष्यजन्मासारखी देणगी व्यर्थ घालविली. झातारपणी कफ- वातपित्तांनी मस्तक फिरून अगास कळा लागल्यावर ईश्वराकडे चित्त कोठून लागणार ? व हातानें सत्कर्म कसे होणार ? कोण-तेही सत्कृत्य करण्याचा प्रसंग आला असतां तो दवडूं नये. उद्या,