पान:गद्यरत्नमाला.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कालव्यय.

१३५


हैं फार वाईट आहे. यानें पुष्कळांस बुडविलें आहे. आज एक कृत्य करावयाचे आहे तें उद्यांवर टाकिलें तर आजचें एक व उद्यांचें दुसरें अर्शी दोन उद्यां कशीं होतील ? जो योग्य काळीं आपले कर्तव्य करील तो या संसारसागरांतील तुफानांत कधीं सांपडणार नाहीं. कालव्यवस्था ही एक संसारमहानदी तरून जाण्याची नौका आहे. ज्याची कालव्यवस्था नीट नाहीं, त्याची फुटकी नाव. त्यावर केव्हां घाला येईल याचा नियम नाहीं.
 मनुष्याच्या हातून व्यर्थ कालक्षेप होऊ नये यासाठीं लहान- पणापासून त्याच्या मनांत कालाची किंमत ठसविली पाहिजे. काल किती त्वरित जातो, हें त्यास समजलें पाहिजे. बहुतकरून पुष्कळ लोकांस काळाची योग्यता बरोबर समजत नाहीं. प्रत्येक मनुष्यास आपणास आयुष्य पुष्कळ असावेंसें वाटतें. असें असून तें आयुष्य मनुष्यें व्यर्थ घालवितात हे केवढे आश्चर्य आहे? आयुष्य क्षणभंगुर आहे. असें बहुतकरून सर्व लोक समजतात. असें असून तेच त्याचा असदूपय करतात, हें केवढें नवल आहे ? पुष्कळ क्षुद्र वस्तूंचा माणसास लोभ असतो, परंतु ते काळासारख्या अमोलिक वस्तूचा हवा तसा उधळेपणानें खर्च करतात, हा मनुष्याच्या अंगीं मोठाच असंबद्धपणा आहे. तीन दिवसांचा उपाशी, पोट खपाटीस गेलेला भिकारी दृष्टीस पडला तरी, रुपयांच्या खुर्द्यातून एक पैसा त्यास देण्यास ज्यांच्या जि- वावर येते, असे मनुष्य शुष्क गप्पा मारून वर्षीच वर्षे फुकट दवडतात. जो वेळ व्यर्थ जाऊं न देण्यास जपत नाहीं, त्याचा संसार व्यवस्थित राहणार नाहीं, आळसानें तो आपणास अनेक शत्रु उत्पन्न करतो. सध्या हयगय करून तो पुढील पश्चात्ता- पाचें बीजारोपण करतो.
 बाळपणीं आळस करून विद्याभ्यासादिक आवश्यक कर्तव्यें केली नाहींत झणजे तारुण्यांत फटफजिती होऊन अनेक दुःखें प्राप्त होतात. ज्याने तारुण्यांत नीतीनें वागून परोपकारादि स-