पान:गद्यरत्नमाला.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मर्यादा.

१३३


यांस आनंद होत आहे. कित्येक गोष्टी आपल्या संवयीच्या मंड- ळीमध्ये बसलें असतां बोलण्यास किंवा करण्यास हरकत नसते; त्या गोष्टी आपल्यापेक्षां वडील किंवा लहान यांच्या समक्ष करणें योग्य नसतें. वडिलांचा त्यापासून अपमान होतो, व लहानांच्या मनावर त्यांचा भलताच परिणाम होतो.
 मर्यादा लहानांच्या किंवा गरिबांच्या अथवा स्त्रियांच्या अंगीं मात्र पाहिजे असें नाहीं. ती तरुण, ह्यातारे, श्रीमंत या सर्वोच्या अंगों पाहिजे. लहानपणापासून मुलास मर्यादेचा आळा नसला तर तो बिघडतो. तरुणपणीं किंवा वृद्धपणीं अंगीं मर्यादा नसल्यास प्रतिष्ठा राहत नाहीं, इतकेंच नव्हे, पण त्याचे वाईट वळण लहान मुलांस लागून तीं बिघडतात. श्रीमंतांच्या अंगों मर्यादा नसेल तर त्यांचा रहावा तसा बोज व वजन राहणार नाहीं. गरीबांचे आचरण अम- यदि असेल तर त्यांस आश्रय द्यावा असें कोणास वाटणार नाहीं. स्त्री अमर्याद असली तर संसारांत कोणास सुख व्हावयाचें नाहीं. विद्यार्थी दांडगा असेल तर त्याचा अभ्यास चांगला होणार नाहीं. मुलें, विद्यार्थी, चाकर, स्त्रिया, यांनीं आपणाशीं मर्यादेनें वागावें अशी इच्छा असेल तर आईबाप, गुरु, धनी, पति, यांनी आपण नीट वागून समर्याद आचरण करण्याचा त्यांस कित्ता घालून दिला पाहिजे. भिन्न देशांतले, भिन्न चालीचे, भिन्न धर्माचे लोक, एकमेकांत मिसळले ह्मणजे मर्यादा आणि अमर्यादा यांची कित्येक गोष्टींत व्युत्क्रमस्थिति होऊं लागते. म्हणजे एका देशांतील लोकांच्या मताने मर्यादा तीच दुसऱ्यांच्या मतानें अमर्यादा असें होतें. उदाहरण, नवरा आला असतां बायकोनें उठून उभे राहणें, आईबापांदेखत स्त्रीपुरुषांनी परस्पर भाषण न करणें, ह्या दोन्ही गोष्टी आपण मोठ्या मर्यादेच्या समजतों, परंतु युरोपांतील लोक याला मर्यादेचें लक्षण न समजतां स्त्रियांस हिंदुलोक पशूप्रमाणें वागवितात याचे उदाहरण आहे असें ह्मणतात. अशा ठिकाणीं दोघांनीही दुराग्रह सोडून योग्य रीतीनें वागणे हेंच योग्य