पान:गद्यरत्नमाला.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
गद्यरत्नमाला

.

दोन्ही गुण कांहीं अंग स्वाभाविक आहेत; व कांहीं अंशी श्रम- साध्य आहेत. हे गुण लिहिणाऱ्याच्या अंगी असण्याची गरज नसते. तथापि कित्येक गोष्टींविषयीं लिहिणारास जपलें पाहिजे, त्या गोष्टींत वक्त्यास लक्ष पुरवावें लागत नाहीं, लेखकाचा म जकूर पुष्कळ वेळ लोकांपुढे असतो; याकरिता उपक्रम, उपसं- हार, पूर्वापरसंबंध इत्यादि गोष्टींकडे लेखकाचें विशेष लक्ष असले पाहिजे. उत्तम वक्ता आपल्या चातुर्याने श्रोत्यांच्या मनांवर भूल उत्पन्न करून त्यांस आपणाकडे वळवितो, तसें ग्रंथकाराचे होत नाहीं. वाचकांच्या मनांत जितक्या शंका येण्याचा संभव आहे. त्या सर्वांचे निवारण लेखांत झाले पाहिजे. असें असेल तरच ग्रंथकाराचा भाव बरोबर लोकांस कळेल.

मर्यादा

.

मर्यादा पाळावी निजशिव गुरुचोच पाय रीतीतें ।


सोडूं नये कवि ह्मणती साधुपदाचीच पायरी तीतें ॥१॥


मोरोपंत.


 ज्या प्रसंगास व ज्या स्थळीं योग्य जें आचरण तें त्या प्रसंगास व त्या स्थळीं करणें यास मर्यादा ह्मणतात. प्रसंगास व स्थळास अयोग्य जें वर्तन त्यास अमर्यादा म्हणतात. मर्यादा हा गुण सर्व मनुष्यांचे अंगीं अवश्य पाहिजे. मर्यादा हा मनुष्याच्या चांगुल- पणाचा पाया आहे. मर्यादा लहानपणापासून आईबाप व इतर घरातील माणसें यांनी मुलांस शिकविली पाहिजे. मुलें, स्त्रिया, पुरुष, या सर्वाच्या अंगीं मर्यादा असणें अवश्य आहे. मनुष्य एकदा अमर्याद वागूं लागला हाणजे किती वाईट होईल याचा नियम नाहीं. सर्वोस त्याचा कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे त्याचे दुर्गुण त्याच्या कानीं जात नाहींत. असें होऊन आपण करतों हैं। चांगलेच, असें त्यास वाटून तो अधिकच फुशारतो. त्याच्या मूर्खपणास लोक हंसले तरी त्यास वाटतें कीं, माझी वागणूक पाहून