पान:गद्यरत्नमाला.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाषण आणि लेखन.

१३१


भाषण आणि लेखन.


 सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य ज्या गुणांनीं श्रेष्ठ झाला आहे, त्या सर्वेमध्ये भाषणशक्ति हा मुख्य गुण होय. मनुष्यास ज्ञान अ- वश्य पाहिजे हें खरें, परंतु तेंच ज्ञान भाषणाशिवाय प्राप्त होत नाहीं, व प्राप्त होऊन भाषणशक्ति गेली तरी त्याचा कांहीं उप- योग व्हावयाचा नाहीं. रानटी व सुधारलेले या सर्व देशांतील माणसांस बोलतां येतें; पण उभयतांच्या भाषणांत फार भेद अ- सतो. तसेंच सुधारलेल्या देशांतसुद्धां उत्तम बोलणारे असे फारच थोडे असतात. लिहिणें हा एक बोलण्याचाच प्रकार आहे. बोलण्यांत आग्ण ऐकणारांस साक्षात् आपला भाव कळवितों; लिहिण्यानें त्यांस परंपरेनें कळवितों. ज्याच्या योगानें वक्त्याच्या किंवा लिहिणान्याच्या मनांतील भाव पूर्णपणे श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनांत उतरतो, तें बोलणें किंवा लिहिणें उत्तम होय.
 बोलणें किंवा लिहिणे चांगले येण्यास पुष्कळ गोष्टी अवश्य आहेत. त्यांपैकी कित्येक ईश्वरदत्त असतात; त्या अंगी नसल्यास प्राप्त व्हावयाच्या नाहींत. कित्येक श्रमसाध्य असतात. बोलणें किंवा लिहिणे चांगले येण्यास प्रथमतः भाषा शुद्ध आली पाहिजे. भाषा येण्यास तिच्या व्याकरणाची चांगली माहिती पाहिजे. केवळ भाषा शुद्ध येणें एवढेच पुरे नाहीं, ती लिहितांना किंवा बोलतांना समयोचित शब्द योजिले पाहिजेत. प्रसंगास अनु- कूल असे शब्दार्थालंकार केले पाहिजेत. विद्वान्, प्रतिष्ठित, सभ्य ज्या पद्धतीवर बोलत असतील त्या पद्धतीचं भाषण असले पाहि- जे. वाक्यरचना चांगली पाहिजे. कित्येक गुण बोलणाराच्या अंगी असावे लागतात ते लिहिणाच्याच्या अंगी नसले तरी चालतात. जो श्रोत्यांचे नेत्र व कर्ण ह्रीं इंद्रियें आपणाकडे वळ- वून घेईल तो उत्तम वक्ता खरा. श्रोत्यांचे नेत्र ओढून घेण्यास रसास अनुकूल असे अंगविक्षेप वक्त्यास करितां आले पाहिजेत. कान ओढून घेण्यास त्याचा स्वर मधुर असला पाहिजे, हे