पान:गद्यरत्नमाला.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
गद्यरत्नमाला

.

करतो, तोच खरा सभ्य होय. सद्गुण आणि सभ्यपणा यांचा वि- रुद्धपणा नाहीं. किंबहुना ते एकच आहेत, असें झटलें तरी चालेल. दुसन्याच्या शरीरास किंवा मनास पीडा न देणें हें सद्गुणाचें व सभ्यपणाचें आचरण आहे. दुसन्यास संकटांत पाहून त्यावर दया करणें, कोणीं अपराध केला असतां क्षमा करणें, लीनता, शांति, हे गुण सभ्यपणा मिळविण्यास अवश्य पाहिजेत. केवळ वस्त्रपात्राची ठाकठिकी, बोलण्याचालण्यांत बेतबात, एवढ्यानेंच सभ्यपणा येतो • असें नाहीं. कित्येक वेळां तर लबाड मनुष्य लोकांस फसविण्या- करितां ह्या बाह्य गुणांचें मुद्दाम धारण करतात, तथापि त्यांचा खरा स्वभाव उघाडीस येतोच. हे गुण अंतःकरणापासून स्वभा- वतःच उत्पन्न झाले असतील तर फार शोभतात. कित्येकांच्या अंगीं सभ्यपणा नसून ढोंगानें ते तो धारण करितात, व त्यावरून त्यांस थोडा तरी मान मिळतो. ह्यावरून जगांत सभ्यपणा सर्वोस प्रिय आहे, असे सिद्ध होतें.
 खरा सभ्यपणा अंगीं येण्यास चांगला स्वभाव व विद्या हीं . दोन कारणें आहेत. शक्तीप्रमाणें दुसऱ्यांवर दया करणें, दुसन्यांस पीडा न करणें, नम्रपणाने बोलणें, परोपकाराविषय तत्पर असणें, मित्रांशी सलगीनें वागणें, दुष्टांची संगति टाकणे, सुजनांशीं भ लेपणाने वागणें, ताब्यांतील माणसांस ममतेने वागविणें, शिक्षेचा प्रसंग आल्यास ती बेताने करणें, उपकार केला तरी डौल न मिरावणें, आपण ह्मणतों तेंच खरें असा हट्ट न धरणें, मतभेद पडला तरी शांतपणानें वाद करणें, क्षुल्लक कामाकरितां हट्ट न धरणें, दुसन्यांस मोडून काढणें किंवा दोष देणें यांविषयीं उत्सुक नसणें, भांडण मिटवून समेट करण्यास झटणे, विनाकारण दुस- याच्या कारभारांत हात न घालणे, दुसऱ्यांचीं गुह्ये जाणण्यास उत्सुक नसणें, यथाशक्ति दुसऱ्यांच्या दुःखांचा उपशम करणें, विनाकारण लोकांवर भार न घालणे, विद्याधनाचा गर्व न वाहणें, व सर्वांशी मिळून मिसळून राहणें, हीं खऱ्या सभ्यपणाची लक्षणे होत.