पान:गद्यरत्नमाला.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
क्षमा.

१२७


आहे तर मग लागलेच आपण रागावणें हें वाईट नव्हे काय ! लोक मूर्खपणाने वागले, म्हणून त्यापासून आपल्या मनाची स्व- स्थता मोडणें हें त्यांच्या अपराधाबद्दल आपण शिक्षा भोगणें आहे. यासाठी लोकांत राहून ज्यांस सुखानें काळ घालविणें असेल त्यांनीं शांति धरण्याची संवय केली तितकी थोडीच. जेथें शांति नाहीं, तेथें दुःखाचा प्रवेश लवकर होतो, जेथे शांति आहे, तेथें सुखाचा वास सतत असतो.

क्षमा.


क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ।


अतृणे पतितो वन्हिः स्वयमेव प्रशाम्यति ॥ १ ॥


 अर्थ - क्षमाशस्त्र ज्याच्या हातांत आहे, त्याचें दुर्जन काय करील ? गवत नाहीं अशा जागीं पडलेला अभि आपल्या आपण विझतो.
 क्षमा हा गुण मनुष्यांच्या अंगीं अवश्य पाहिजे, ज्यानें ज- मांत कोणाचा अपराध केला नाहीं, त्यानें दुसऱ्याचे अपराध सोसले नाहींत तर चालेल; परंतु असा मनुष्य कोण आहे ! मु- द्दाम किंवा न कळून ज्याच्या हातून जन्मांत दुसऱ्याचे कांहीं वा ईंट झालें नाहीं, असा मनुष्य बहुश: सांपडणे कठीण. अशी स्थिति आहे तर क्षमा धारण करणें हें मनुष्याचें कर्तव्य होय. मनुष्याचे अंगीं क्षमा नसेल, तर संसारांत किंबहुना जगांत फारच अनर्थ होतील. दुसऱ्याने केलेल्या अपराधांबद्दल त्याची खोड मोडावयाची, असें मनांत आणिलें तर जगांत दुःख फार वाढेल. एकानें अपराध करावा, दुसऱ्यानें त्याबद्दल त्याचा सूड उगवावा, पुनः पहिल्यानें आपले स्नेही मदतीस आणून त्यांस आ- णखी पीडा करावी. असें होतां होतां मोठाल्या लढायापर्यंत येऊन रक्ताचे पूर वाहण्याचे प्रसंग येतील. मनुष्याच्या सर्व मनोविकारांमध्यें सूड उगविण्याची इच्छा ही फारच घातुक होय.