पान:गद्यरत्नमाला.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
गद्यरत्नमाला

.

हिच्या योगाने शत्रूची हानि होतेच असा कांहीं नियम नाहीं, परंतु इच्छा करणाऱ्याचा मात्र तोटा आहे. या इच्छेमुळे त्यास दुसऱ्या कोणत्याहि गोष्टीपासून सुख होत नाहीं. दुसन्याच्या पीडेनें जी मनुष्यांची हानि होते, तिजपेक्षां तीबद्दल सूड उग- विण्याच्या इच्छेनें अधिक होते. शत्रूच्या पीडेनें जो मनांत संताप उत्पन्न होतो, त्यापेक्षां सूड उगविण्याच्या इच्छेने अधिक मनः- क्षोभ होतो. क्षमा हैं साधुत्वाचें मुख्य लक्षण होय. आजपर्यंत जगांत जे साधु होऊन गेले, त्यांच्या अंग क्षमा असल्यानु- ळेच त्यांचे साधुत्व प्रसिद्धीस आलें. ज्या मानानें मनुष्याच्या अंगीं क्षमा अधिक त्या मानानें तो अधिक श्रेष्ठ व जितकी अंग क्षमा कमी, तितका मनुष्य अधिक नीच. असें सर्व दे शांतील लोक समजतात. क्षमेच्या योगानें शत्रु देखील मित्र होतात. मातापितरें, गुरु, राजा, इत्यादिकांच्या अंगीं क्षमा न- सेल, तर त्यांच्या हातून आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावलें जाणार नाहीं. किंबहुना, ज्याच्या अंगीं क्षमा नाहीं, त्यास सदा- चारानें वागून स्वर्गप्राप्तीची योग्यता आपल्या अंगीं आजही गोष्ट अशक्य होय.

सद्गुण.


 सद्गुणांच्या योगानें मनुष्य लोकांत पूज्य व प्रिय होऊन स्व- र्गास जाण्यास योग्य होतो. याकरितां सद्गुण ह्मणजे काय हे सर्वांनी पक्के लक्षांत ठेविले पाहिजे. सद्गुणांचे सामान्य लक्षण हाणजे पर- हित व सत्य भाषण करणें हैं होय. सद्गुणांपासून स्वतःचे व जगां- तील सर्व मनुष्यांचे हित होते. सगुणी मनुष्य दुसन्याचे दुःख पाहून दुःखी होतो आणि तें निवारण करण्यास झटतो. तो स्वतः न्यायानें वागून इतरांस सदाचरणाचे वळण लावितो. त्यापासून इतरांचें बहुत हिंत होतें, सद्गुणी मनुष्याचें मन सर्वदा सुखी व शांत असतें. सुख व शांति हीं दुसऱ्या कोणत्याहि वस्तूनें प्राप्त