पान:गद्यरत्नमाला.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
गद्यरत्नमाला

.

आनंद व्हावयाचा, तीच त्याचें अंतःकरण क्षुब्ध करण्यास कारण होतात. आरोग्य, संपत्ती, ह्या ज्या ईश्वराच्या अमोलिक देणग्या त्यांपासून सुद्धां त्यास सुख नाहीं. एवढेसें कांहीं बिनसलें कीं, झाला अंगाचा तिळपापड, अशी स्थिति झाली ह्मणजे दिवसभर मग कोणत्याहि गोष्टीपासून त्याचें मन आनंदित होत नाहीं. कि- त्येक वेळां रागाची कारणें फार क्षुल्लक असतात, परंतु याच्या रागीट स्वभावामुळे ती त्यास मोठीं दिसतात. त्यामुळे हा आपल्या सुखास मुकतो. थोडी शांति धरील तर त्यास किती सुख हो- ईल ? तो आपण होऊन आपले मन यःकश्चित् हलक्या माण- सांच्या स्वाधीन करतो. एकाद्या रागीट मनुष्यास इतकें वा- रंवार काय रागावतां; असें विचारिलें तर तो ह्मणतो, काय; मी दगड आहे काय ? मनुष्याच्यानें असा अपमान, असा दांडगे - पणा, कसा सोसवेल ? गोष्ट खरी. पण इतका ज्याचा स्व- भाव तापट असेल, त्यानें लोकांस एकदम सोडून रानांत जाऊन राहावें हें बरें. लोकांशी वागतां येत नाहीं तर मुळींच संबंध ठेवूं नये हैं चांगलें, लोकांत राहिलें कीं, भांड्याला भांडे ला. गावयाचेंच. आकाश स्वच्छ असलें तरी एकाद्या वेळेस ढग येऊन वादळ व्हावयाचेंच. त्याप्रमाणे जगांत चांगले मनुष्य पुष्कळ असले, तरी दांडगे, लोभी, अविचारी, कृतघ्न, मतलबी, असे लोक सर्व ठिकाणी आहेत. ते या संसारवृक्षाचे कांटेच समजावयाचे. शांति धरून संसारांत अवश्य प्राप्त होणाऱ्या अडचणी सोसून जो पार पडून जाईल, तोच मनुष्य ह्या उत्तम शब्दाचा वाच्य होय.
 ज्या क्षुल्लक कारणापासून रागावून आपण संतापतों त्याचा शांत मन करून विचार केला असतां, असें कळेल कीं, त्यांत कांहींच अर्थ नाहीं. आपल्या वेडेपणाने त्यापासून आपली हानि झाली. कांहीं वेळ शांति धरिली तर ज्याच्या मूर्खपणानें आपणास राग यावयाचा, त्याचें मन त्यास खाऊं लागतें. असें