पान:गद्यरत्नमाला.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शांति.

१२५


णतां येईल काय ? लाखों माणसें मारून रक्ताच्या नद्या वाह- विण्यास ईश्वराने एकाद्या शांत सुपीक देशावर सैन्य पाठविलें आहे काय ? मनुष्यांच्या दुर्गुणाशिवाय या अनर्थोस दुसरें काय कारण आहे ? राजांची महत्वाकांक्षा, प्रधानांची भांडणे, धर्माचा खोटा अभिमान बाळगणाऱ्यांचा मतलबीपणा, वगैरे गोष्टींनीं जगांत किती अनर्थ झाले आहेत ? अशा गोष्टींस ईश्वरी क्षोभ हैं किती वेडेपणाचे काम आहे ? मनुष्यें सदाचरणाने वा- गतील तर हे अनर्थ जगांतून समूळ नाहींतसे होतील. याकरितां दुःख झालें असतां ईश्वरास दोष न देतां, त्यावर भरंवसा ठेवून सदाचरणानें वागावें, हाच सुखाचा उत्तम मार्ग होय.

शांति.


 मूर्ति तितक्या प्रकृति' अशी एक ह्मण आहे, ती अक्षरशः खरी आहे. या अफाट जगांत एका स्वभावाची दोन मनुष्यें आजपर्यंत कोणास आढळलीं नाहींत. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा, त्याची रुचि वेगळी, अशा या विचित्र जगांत वागण्यास मनुष्याच्या अंगी शांति अवश्य पाहिजे; नाहीं तर त्यास इतरांशीं बागतां यावयाचें नाहीं. राजापासून रंकापर्यंत कोणत्याहि लहान- मोठ्या स्थितीत माणूस असला तरी त्यास आपल्या कुटुंबांतील माणसांशी व लोकांशी वागले पाहिजे; तेव्हां अर्थात् शेकडो वेळां आपल्या मनासारखें न होऊन रागाचे प्रसंग येणार. पदरच्या मा- णसांनीं मूर्खपणा केला, मित्रानें स्नेह सोडला, चाकरांनी आज्ञाभंग केला, लोकांनी अपमान केला, वरिष्ठांनी छळ केला, दुष्टांनीं निंदा केली, वगैरे शेकडों प्रसंग सर्वास आहेत. यांपैकीं एकहि प्रसंग आ- ला नाहीं, असा एकहि दिवस तापट मनुष्याच्या आयुष्यांत सांप- डणे कठीण. तापट मनुष्याचें अंतःकरण नेहमीं क्षुब्ध असतें. मन शांत ठेविल्यानें काय सुख होतें, याचा त्यास मुळींच अनुभव नाहीं. चाकरमाण में, शेजारीपाजारी, बायकामुलें, वगैरे ज्यांपासून