.
नशिबास दोष लावावा हा केवढा मूर्खपणा आहे ? सर्वांशीं नसले तरी बहुतांश आपले कल्याण करून घेण्याचें मनुष्याच्या स्वाधीन आहे. एका कवीनें म्हटलें आहे :-
यात्यधोधो व्रजत्युच्चैर्नरः स्वेनैव कर्मणा ।
कूपस्य खनिता यद्वत्प्रासादस्येव कारकः ॥
अर्थ- मनुष्य आपल्या कर्मानेंच उच्च किंवा नीच स्थितीस जातो; जसें विहीर खणणारा खणीत खणीत खालीं खाली जातो. आणि वाडा बांधणारा मजल्यावर मजला चढवीत वर वर जातो.
मनुष्याचा कांहींएक दोष असल्याशिवाय जगांतील सर्व वस्तु त्यास प्रतिकूल होतील असें कधीं व्हावयाचें नाहीं. ईश्वरभक्ति, सदाचरण, उद्योग, सत्स्वभाव, जितेंद्रियता, सदसद्विचार, प्रामा- णिकपणा, हीं सुखप्राप्तीचीं निश्चित साधनें आहेत. जे मनुष्य विपत्तींत असतात त्यांच्या अंगीं वरील गुण नसतात, एवढेच त्यां च्या दुःखाचें मूळ कारण होय. आपला अपराध दुसऱ्यावर घा लावा हा मनुष्याचा स्वभावच आहे. याकरितां ज्या वेळेस दुस- रा कोणी सांपडत नाहीं, त्या वेळेस दैवास दोष लावावयाचा. मनुष्य प्रथम सदसद्विचार सोडतो. सदसद्विचार सुटला ह्यणजे दु- राचरण करतो. दुराचरण केलें ह्मणजे दुःख प्राप्त होतें. असें झालें ह्मणजे मग ईश्वरास दोष लावून आणखी पाप करतो. सुख प्राप्त झालें ह्मणजे तें मात्र आपल्या शाहाणपणानें असें समजावयाचें. दुःख होईल तेवढे मात्र ईश्वरानें दिलें असें ह्मणावयाचें. वास्त विक पाहतां उलट स्थिति आहे. सुख मात्र ईश्वराच्या कृपेनें प्राप्त होतें, आणि दुःख आपल्या दुराचरणानं होतें.
वर सांगितलेल्या गोष्टी केवळ व्यक्तीस लागू आहेत असें नाहीं ; राष्ट्राचेहि तसेंच आहे. हाडवैर पडून अनेक लढाया हो ऊन देशांचे देश धुळीस मिळतात. मोठमोठाली सैन्यें परस्प रांच्या अंगावर जाऊन रणभूमीवर रक्ताच्या नद्या उत्पन्न करतात ! शिवशिव, काय अनर्थ हे !! हे अनर्थ ईश्वर आणितो, असें हा-