पान:गद्यरत्नमाला.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुर्दैव.

१२३


लागलाच दैवास दोष लावूं लागतो, दुसऱ्याचा हेवा करतो, व देवाच्या घरी न्याय नाहीं असेंहि ह्मणतो. अशा मनुष्यास प्र- कृति विघडण्याच्या कारणाविषयीं प्रश्न केला असतां हल्लींचें दु- खणें येण्यासारखे माझ्या हातून आजपर्यंत काहीएक वाईट कत्य झालें नाहीं, हा केवळ ईश्वरी क्षोभ होय, असें त्याच्याने प्रामा- णिकपणानें छातीवर हात ठेऊन सांगवेल काय ? आरोग्यरक्षणास आवश्यक अशा आहारविहाराच्या नियमानें तो वागता, तर त्या- वर असा प्रसंग आला असता काय ? यथेच्छ आहारविहार क रून अशी स्थिती प्राप्त झाली तर, त्यानें दैवास कां दोष ला- वावा ? आणि ईश्वरास कां अन्यायी हाणावें ? रोग व विपत्ति हीं ज्यांस प्राप्त झाली आहेत अशा मनुष्यांच्या स्थितीचा शोध केला असतां असें कळेल कीं, बहुतेकांस आळस, अधाशीपणा, दुर्व्यसन, वगैरे गोष्टींपासून अशी स्थिति प्राप्त झाली यांत संशय नाहीं. हजारों रोगी व दुःखी पाहिले असतां, केवळ नाशवानें ज्यास अशी वाईट स्थिति प्राप्त झाली आहे, असे फारच थोडे सांपडतील. अल्पवयांतच कित्येकांचीं मुखें टवटवी जाऊन म्लान झालेलीं, कित्येकांस ऐन उमेदींतच क्षयाची भावना झा- लेली, असे लोक दृष्टीस पडतात. पण बहुशः हीं सर्व दुःखें त्यांनी मूर्खपणानें व दुराचरणानें आपणाला प्राप्त करून घेतलेलीं असतात. असे असूनहि ते ईश्वरास दोष देतात.
 कित्येक शरीरानें दृढ असतात. पण अठरा विश्वे दारिद्य त्यांच्या पाठीस लागलेलं असतें. नेहमीं ज्या त्या कामांत निराश होतात. बरकत येत नाहीं. अशा मनुष्यांनीं पूर्वीपासून आपल्या आचरणाचा विचार केल्याशिवाय एकाएकीं देवास दोष देऊं नये. आळस, गर्व, राग, दुर्व्यसन यांच्या योगानें त्यांनी आपला कल्याण करून घेण्याचा काल कधींच घालविला नसेल काय ? आपण मौजा मारून काळ घालवावा आणि लोक श्रमाने व सदाचरणानें वागून आपणांपेक्षां अधिक सुखी झाले ह्मणजे