पान:गद्यरत्नमाला.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
गद्यरत्नमाला

.

 अर्थ- सर्व व्यवहार वाणीपासून उत्पन्न झाले. ते वाणीच्या योगानें चालतात. अशा वाणीप्रत जो चोरतो, ( असत्य भाषण करतो ) तो सर्व वस्तु चोरणारा होय.
 दुटप्पी बोलणें हें खोटें बोलण्यासारखेच आहे. त्याचा मुख्य उद्देश दुसऱ्यास फसविणें हा होय. द्यर्थी शब्द बोलून मनांत एक अर्थ असून दुसऱ्यास भलताच समजविणें हैं खोटें बोल- ण्यासारखेच पाप आहे. कधीं कधीं केवळ मान हालविण्यानें अथवा नुसतें हूं झटल्यानें सुद्धां खोटें बोलण्याचा परिणाम होतो.
 अमुक गोष्ट अमुक प्रकारानें करीन असें एकाद्यास सांगून तें वचन मोडून त्याप्रमाणें न करणे यास विश्वासघात हाणतात. हाहि खोटे बोलण्याचा भेद आहे. याकरितां आपलें कसेंहि लहानमोठें वचन असलें तरी, तें नियमाने पाळावें. असें करील तोच प्रामाणिक मनुष्य होय.

दुर्दैव.


जगाच्या स्थितीवरून असें दिसतें कीं आपणास वाटतील तशा गोष्टी घडून याव्या, असें करणें मनुष्याच्या स्वाधीन नाहीं. कधीं कधीं मोठमोठ्या साधूंवर देखील अनिवार्य संकटें येतात. याविषयीं बहुतांनीं बहुत प्रकारचे तर्क केले आहेत. कोणी हाण - तात कीं, हें पूर्वजन्मार्जित पातकाचें फळ होय. जे पूर्वजन्म मानीत नाहींत, ते म्हणतात कीं हा मनुष्य स्वर्गसुखास पात्र झाला किंवा नाहीं याविषयीं त्याच्या अंतःकरणाची परीक्षा पाह- ण्याकरितां ईश्वर त्यावर अशीं संकटें आणितो. यांपैकीं काय खरे असेल तें असो, याविषयीं येथें विशेष लिहीत नाहीं. का- रण, असे प्रसंग बहुशः फारच थोडे असतात. लक्षपूर्वक पा- हिलें असतां असें दिसून येईल कीं, आपल्या दुराचरणामुळेंच विपत्ति प्राप्त झालेल्या मनुष्यांचीं पुष्कळ उदाहरणें सांपडतील. एकाद्या मनुष्यास दुखणें येऊन जरा प्रकृति बिघडली कीं, तो