पान:गद्यरत्नमाला.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
असत्य भाषण.

१२१


असत्य भाषण.


 असत्य भाषण करण्यांत मनुष्याचा कांहीं तरी नफ्याचा उद्देश असतो. खरी स्थिति सांगितली असतां तत्काळ जें कांहीं नुकसान होईल, तें टाळावें म्हणून मनुष्य खोटें बोलतो. परंतु वास्तविक त्यापासून किती अहित आहे, हें त्यास समजत नाहीं. त्यामुळे शेवटीं त्याचें फार नुकसान होतें.
 खोटे बोलणाराची लबाडी कधींना कधीं तरी बाहेर पडतेच. लबाडी बाहेर पडल्यावर त्याच्या खऱ्या बोलण्यावर सुद्धां कोणी भरं- वसा ठेवीत नाहीं, ही मोठी हानि नव्हे काय ? एकदां खोटें बो- लल्यावर ती लबाडी छपविण्याकरितां त्यास पुष्कळदां खोटें बो- लावें लागतें. त्यामुळे त्याची लवाडी समजण्यांत येते. बहुश: अ- पराध छपविण्याकरितां मनुष्य खोटे बोलतो. परंतु त्यापासून त्याचा उद्देश सिद्धीस न जातां त्याच्या हातून खोटे बोलण्याचे मात्र अधिक अपराध होतात. केवळ ऐहिक दृष्ट्या पाहिलें तरी अप- राध झाला असतां तो कबूल करणें यांत विशेष हित आहे.
 खोटे बोलण्याचं मुख्य कारण भित्रपणा हे उघड आहे. खरी हकीकत सांगितली असतां किंचित् अहित होईल तें सोस- ण्याचें धैर्य अंगीं नसल्यामुळे मनुष्य खोटें बोलतो, हा त्याचा नीचपणा होय.
 वाणीरूप जी ईश्वराची अमोलिक देणगी, जिच्या योगानें मनुष्यास मनुष्यपणा आला आहे, ती असत्य भाषणानें विटाळणे हें फारच मोठें पाप होय. घर, आळी, गांव, शहर, राष्ट्र या सर्व गोष्टींचा पाया सत्य आहे. एका मनुष्यानें सत्य सोडिलें, त्याचें पाहून दुसऱ्यानें सोडिलें, असें होऊन जगांत असत्य माजलें तर सर्व व्यवहार मुरळित चालावयाचे नाहींत यामुळेंच मनूनें सांगितले आहे:-
 वाच्यर्था नियताः सर्वे वाङ्मूला वाग्विनिःसृताः ॥
 तां तु यः स्तेनयेद्वाचं स सर्वस्तेयकृन्नरः ॥ १ ॥