पान:गद्यरत्नमाला.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
गद्यरत्नमाला

.

श्रयाची गरज नाहीं, असें उत्तर सांगून पाठवितां हें मोठें आश्चर्य आहे. हैं कृतघ्नपणाचें उत्तर आहे. हा कृतघ्नपणा तुमच्या विद्व- तेस योग्य नाहीं, येवढें सांगण्याकरितांच बोलाविलें.
 हें भाषण ऐकून पंडित हाणाला, म्यां विशेष काय केलें ? तुमच्याप्रमाणे माझी वागणूक आहे. तुमचें आचरण वाईट आहे. असें जर तुह्मांस वाटत नाहीं, तर माझें तरी कां वाटावे ? सर्व- शक्तिमान परमेश्वरानें दयेनें तुह्मांस इहलोकीं सुख दिले आहे. शरीरसंपत्ती, ऐश्वर्य, विद्या, संतति, सत्ता वगैरे सर्व गोष्टी परमे• श्वरानें तुह्मांस दिल्या, असें असून सर्व दिवसांत क्षणभर सुद्धां तुझी त्याचें स्मरण करीत नाहीं, ही तुमची मोठी कृतघ्नता नव्हे काय ? हें ऐकतांच राजाचें अंतःकरण विव्हळ होऊन डोळ्यां- तून अश्रू वाहूं लागले. तेव्हांपासून तो परमेश्वराचें ध्यान, पूजन करूं लागला.

मातापितरांविषयीं प्रीति.


 गुरु शिष्यास ह्मणतो - मुला, परमेश्वरानें मनुष्यास बुद्धि देऊन ज्ञानप्राप्ति करून घेण्याची साधनें सृष्टीमध्ये ठेविलीं आहेत. पहा, ते झाडावरचे पक्षी कसे आपल्या पिलांचें रक्षण करतात ? पहा, ती मादी कशी अड्यांस जयते ? पक्क होण्याकरितां ती त्यांस पं खाखाली घेऊन उडविते. अंडी फुटून लहान लहान पिलें झाल्या- वर त्यांस चोंचीनें खाऊं घालते. यावरून ईश्वराचा उद्देश स्पष्ट दिसतो, तो असा कीं, आईबापांनी मुलांचे रक्षण कर वें, आणि मुलांनीं त्यांवर प्रीति करावी.
 पितृभक्ति हैं मोठें पुण्यसाधन आहे. मातापितरांनी बाळरणा- पासून तुझें रक्षण केलें आहे, त्यांवर प्रीति कर. त्यांची आज्ञा मान. त्यांस योग्य मान दे. ह्मातारपणीं त्यांस जप त्वां असें केलें, हणजे तुझीं मुलेंही याप्रमाणे करतील.