पान:गद्यरत्नमाला.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राजा आणि पंडित.

११९


गेला तरी जे चांगले पदार्थ झाले असतील त्यांची स्तुति करावी. अशा संवयीनें त्याचा उत्तम स्वभाव होऊन तो सर्वांस आवडूं लागला. त्यामुळे त्यास पुष्कळ मित्र झाले

राजा आणि पंडित.


 एका राजाचे घरी एक मोठा पंडित होता. तो मोठा विद्वान् असल्यामुळे राजानें त्यास मोठे वेतन देऊन पदरीं आश्रित ठे- विलें होतें. पंडित मोठा चतुर व वक्ता असल्यामुळे त्याच्या संभा- बापासून राजास आनंद होई. आपला यजमान संपूर्ण ऐश्वर्य - युक्त असून सर्वकाळ ऐहिक सुखांत घालवितो, परलोकसाधना- कडे अगदीँ लक्ष देत नाहीं; हें पाहून त्या पंडितास फार वाईट वाटे. त्याने राजास याविषयीं पुष्कळदां सांगितलें, परंतु पा- लथ्या घागरीवर पाणी. शेवटीं पंडितास असें वाटलें कीं, अशा विषयसुखानिमनाच्या पदरीं राहण्यापेक्षां घरी रहावें हें बरें, असें मानून राजानें द्रव्य पूर्वी दिलें होतें तेवढे घेऊन कांहीं कोस लांब खेडेगांवीं त्याचें घर होतें तेथे गेला. बरेच दिवस झाले तरी पंडितवावा परत येत नाहींत, असें पाहून राजानें त्यास बो. लावणें पाठविलें. त्यावर आह्मांस तुमच्या आश्रयाची गरज नाहीं, असें त्यानें सांगितलें. तें ऐकून पुनः राजानें निरोप पाठविला कीं आश्रयाची गरज नसेल तर राहूं नका, परंतु एकवार भेट्न जा. असा निरोप गेल्यावर पंडित आला. पंडित आल्यावर राजा त्यास म्हणाला, पंडितबावा, तुह्मी आमचे पिढीजात आश्रित. तुमचे वडील आमच्या वडीलापांशीं होते. आह्मीं गादीवर बस- ल्यापासून तुह्मांस मोठ्या इतमामानें पदरी बाळगिले आहे. आ- मच्या उजव्या हातास तुमचें पान, वस्त्रपात्र चाहिल तें. जी जी वस्तु तुह्मांस पाहिजे ती आह्मीं कधीं नाहीं झटली असें आह्मांस स्मरत नाहीं. मोठ्या एकाद्या शास्त्रार्थाच्या प्रसंगाशिवाय आह्मी तुह्मांस कांहीं काम सांगत नाहीं. असें असून तुझी आमच्या आ-