पान:गद्यरत्नमाला.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
गद्यरत्नमाला

.

हिले ह्मणजे वाईट असेल तेवढे लागलेंच त्याने अगोदर सांगावें. त्याच्या घरांत सर्व वस्तु होत्या तरी कोणीं, कसें काय आहे, असें विचारिलें ह्मणजे एकादी वस्तु नसेल तेवढी सांगून रडगाणे ला वावयाचें. कोणाच्या घरी जेवावयास गेला तरी एकादा पदार्थ नासलेला असेल तेवढ्याविषयीं त्यानें बोलावें. त्यापाशीं सहज कोणी गोष्टी सांगत बसले तरी दिवसभर त्यानें संकटांच्या व धो- क्यांच्या गोष्टी सांगाव्या. याप्रमाणे होता होतां त्याचा स्वभाव अगदी उलट झाला; त्याचें तोंड नेहमीं उदास दिसूं लागलें शेवटीं तो व त्याचें भाषण कोणास आवडेनासें झालें. यामुळे त्याचे इष्टमित्रहि कमी झाले.
 कृष्णरावाचा स्वभाव अगदीं उलट होता. तो नेहमी उल्हा- सयुक्त असे. त्यावर एक दें संकट आलें झणजे यापेक्षां मोठें आलें नाहीं, असें मानून तो ईश्वराचे उपकार मानी. मंडळींत किंवा एकांत कोठेंहि तो असला, तरी त्याचें अंतःकरण स्वस्थ असे. कोणत्याहि वाईट मनुष्याविषयीं गोष्ट निघाली तरी त्याच्या अंगीं एकादा तरी लहानसहान गुण असेल त्याविषयीं त्याने बोलावें. तो कोठें भिकार जागेत बसलेला असला तरी त्यानें सृष्टीचा चमत्कार पाहून आनंदित व्हावें. कोणीं कांहीं बोलला तरी त्यांत गुण असेल तेवढ्याचें त्यानें ग्रहण करावें. अशा स्वभावाविषयीं एके ठिकाणीं म्हटलें आहे.
 प्राज्ञः प्रवदतां पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः ॥
 गुणवद्वाक्यमादत्ते हंसः क्षीरमिवांभसः ॥ १ ॥
 अर्थ - हंस, पाणी आणि दूध यांच्या मिश्रणापासून दूध मात्र घेतो. त्याप्रमाणें शहाणा मनुष्य लोकांच्या भाषणांतून गुणयुक्त वचन असेल तेवढें ग्रहण करतो.
 कृष्णरावानें एकादें पुस्तक पाहिलें तर त्यांत चांगला भाग असेल तेवढ्याचें त्यानें वर्णन करावें.चित्र पाहिले तरी त्यांत जे- वढें खुबीदार असेल तेवढ्याचें वर्णन करावें. कोठे जेवावयास