पान:गद्यरत्नमाला.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीन देशांतील मोठी भिंत.

११५


त्याचप्रमाणे त्याने एक जुन्या कायद्यांच्या संग्रहाचा ग्रंथ केला आहे. या ग्रंथाची चिनी लोकांत अद्याप फर मान्यता आहे.

 कनफ्युशस व्यहात्तरावे वर्षी मरण पावला. त्याने आपले सर्व आयुष्य लोकहिताच्या उद्योगांत घालविलें. सुमारें चोवीस वर्षे होत आलीं तथापि अद्याप सर्व चीनदेशभर कनफ्यूशंस यास पूज्य मानितात. महमद इत्यादिकांप्रमाणें मी अवतारी आहें, असें कनफ्युशस यानें कर्धीहि म्हटलें नाहीं, तरी तो मेल्यावर चिनी लोक त्यास देवाप्रमाणे मानूं लागले. कनफ्युशस याची पुष्कळ देवालयें चीनदेशांत आहेत. कनफ्युशस याचे वंशज पुष्कळ अहेत, त्या सर्वांस याच्या कुळ. त उत्पन्न झाल्याबद्दल काहीएक प्रकारचे विशेष हक्क आहेत. कनफ्युशस याच्या वेळेस लोक्यून ह्मणून एक ढोंगी बाबा झाला होता. त्यानें एक ढोंग- मत प्रवृत्त केलें त्यांत, किमया, जादु वगैरे पुष्कळ खोटे प्रकार होते. कित्येक राजांनी या मतास अ श्रय दिला. परंतु हल्लीं त्यास कोणी मानीत नाहीं.


चीन देशांतील मोठी भिंत.


 कनफ्युशस याच्या पाठीमागें दोनतीनशे वरपर्यंत चीन देशांत नेहमी बंडाळी चालली होती. लहानसहान राजांच्या लढाया नेहमी सुरू असत. त्या मोडण्यासारखें बादशाहांतहि सामर्थ्य नव्हते. शेवटीं चिहोआंगटी ह्मणून एक राजा झाला. हा मोठा शूर होता. यानें सर्व मांडलिक राजांस जेर करून, आपल्या सत्र्त्तेत ठेवण्याचा बेत केला, आणि त्याप्रमाणे सर्व राजांस जिंकून चीन नांवाचें प्रसिद्ध राजघराणें स्थापित केलें. यामुळेच देशास चीन हें नांव प्राप्त झालें असें म्हणतात. सुमारें दोन हजार वर्षी- पूर्वी हा राजा होऊन गेला.

 स्वदेशांत शांतता करून चिहोआंगटी यानें तार्तर लोकांचा पराभव करण्याचा निश्चय केला, चीन देशांत येऊन तार्तर