पान:गद्यरत्नमाला.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
गद्यरत्नमाला

.

लोक नेहमीं बंडाळ्या करीत असत. या तार्तर लोकांनींच यूरोप खंडांत प्राचीनकाळच्या सर्व राष्ट्रांस बहुत उपद्रव दिला होता. यांस युरोपियन लोक हन्स अथवा सिथिअन्स असें ह्मणत. हे लोक घरेदारे करून रहात नसत. ते नेहमी मध्यएशियांतील देशांत फिरून पारध व लूट यांवर आपला निर्वाह करीत. चिनी लोकांस यांपासून मोठें भय असे. या लोकांचा उपाय चालू नये ह्मणून बादशहानें उत्तरेच्या बाजूस जाड, भरींव, फोडत न येण्यासारखी, व उंच चढतां न येण्यासारखी अशी भिंत बांध. ण्याचा बेत केला. ही अवाढव्य भिंत तडीस नेण्यास पुष्कळ क्रूरत्वाचे व जुलमाचे उपाय योजावे लागले असतील यांत संशय नाहीं. कामास पुरे इतके मजूरदार मिळावे ह्मणून राजानें असा हुकूम केला होता कीं, देशांतील सर्व मजुरांपैकीं तृतीयांश मजू- रांनी या भिंतीच्या कारखान्यांत कामावर राहिलेच पाहिजे. त्यांस जीव वांचण्यास अन्न मिळण्यापुरती मात्र मजूरी मिळेल. पूर्वचा जूस समुद्रापासून पश्चिमेस शेनशी प्रांताच्या शेवटापर्यंत भिंतीची लांची एकंदर पंधराशे मैल आहे. ही भिंत मोठमोठाल्या उंच पर्वतांवरून, व खोल दऱ्यांतून नेलेली आहे; आणि कित्येक ठि काण नद्या लागल्या तेथे कमानी काढून त्यांवरून भिंत नेली आहे. हिची रुंदी इतकी आहे कीं, साहा घोडेस्वारांस समोरास मोरून सहज धांवत जातां येईल. मधून मधून सारख्या अंत- रावर मजबूत बुरुज बांधलेले आहेत त्यांत नेहमीं पाहरा असे. ही भिंत बाहेरच्या बाजूनें दगड व मजबूत पक्कया विटा लावून अगदीं निर्भेद्य केली आहे. इतके असून हैं विलक्षण विस्तीर्ण काम पांच वर्षांत तयार झाले ! मिसर देशांतील मनोरे वगैरे जगांत कांहीं अतर्क्य आश्चर्यकारक वस्तु आहेत; त्यापैकीच ही भिंत आहे.