पान:गद्यरत्नमाला.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
गद्यरत्नमाला.


भाषण खरें आहे, त्याचप्रमाणे कनफ्युशस याच्या अमलाची गोष्ट समजावयाची. पूर्वीपेक्षां याच्या कारकीर्दीत चीन देशांत फार बंदोबस्त झाला असावा; हे या हाणण्यावरून निर्विवाद सिद्ध होतें.

 कांहीं दिवसांनीं प्रधानकीच्या वस्त्रांचा त्याग करून, थो- ड्याशा प्रियमित्रांसहवर्तमान कनफ्युशस तत्वज्ञानाच्या अभ्यासा- कडे लागला. त्याने राजनीति आणि धर्मशास्त्र यांजवर उत्तम ग्रंथ लिहिले आहेत, त्यांवरून त्याचें नांव चीन देशांत अमर झालें आहे. कनफ्युशस याचीं वचनें चीन देशांत अद्याप पूर्ण- पर्णे मान्य आहेत. या वाचनांमध्ये उत्तम नीति सांगितली आहे. कनफ्युशस याचे अनुयायी, एक देव सर्व जगाचा उत्पा- दक आहे असे मानतात. चिनी लोक धर्मशास्त्राप्रमाणें कन- फ्युशस याच्या ग्रंथांचा अभ्यास करतात. मनुष्यांनीं परस्परांशीं कसें वागावें, आईबाप, वडील, अधिकारी यांचा आज्ञा- भंग करूं नये इत्यादि विषयांचे विवरण या ग्रंथांत केलें आहे. कनफ्युशस याने राजधर्मात असें सांगितलें आहे कीं, प्रजेनें रा- जाची आज्ञा पित्राज्ञेप्रमाणे पाळावी व तसेंच राजानें पोटच्या पोराप्रमाणे प्रजेवर प्रीति करावी. लोकांच्या घरगुती वागणुकी- विषय सुद्धां कनफ्स यानें वचनें केलीं आहेत, त्यांत लहा- ना वडिलांशी, कनिष्ठाने श्रेष्ठांशीं, कसें वागावें, इत्यादि प्रकार बारकाईनें सांगितले आहेत.
 कनफ्युशस याचे बहुतेक ग्रंथ नीतिशास्त्रावर आहेत, तरी त्यानें दोन इतिहासाची पुस्तके लिहिली आहेत. एक आपल्या पूर्वी- च्या इतिहासावर आणि दुसरें आपल्या वेळच्या इतिहासावर. पहिले, देशांतील दंतकथा आणि दरबारी कागदपत्र यांच्या आवारानें लिहिलेलें आहे. शिवाय त्याने जुन्या कवितांच्या संग्र- हाचें एक पुस्तक केलें. त्यांत बहुतेक जुन्या कविता घेतल्या आहेत. हा ग्रंथ चीनदेशांतील सर्व विद्वान् लोक शिकतात,