पान:गद्यरत्नमाला.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कनफ्युशस.

११३


कायदे करणारा होऊन गेला. हा राजघराण्यांतील पुरुष होता. चीन देशाच्या उत्तरेकडील लू. या प्रांतांत याचा जन्म झाला. ज्या वेळेस ग्रीस देशाची राजधानी आथेन्स येथे प्रख्यात कायदे करणारा सोलन झाला त्याच वेळेस चीन देशांत कनफ्युशस झाला असावा असा विद्वान लोक तर्क करतात. कनफ्युशस बालपणा- पासून मोठा अभ्यासी असे. त्यानें विश्रांतीचा कालसुद्धां ग्रंथ वाचण्यांत घालवावा. यामुळे थोड्याच वयांत विद्वन्मालिकेत त्याची गणना झाली. एकुणिसावे वर्षी त्याचें लग्न झालें, व त्यास एक पुत्रहि झाला. तथापि संसारसुखांत विशेष न गढ़तां कायदे वगैरे ग्रंथ करण्याकडे त्याने आपला सर्व वेळ लाविला. याची बुद्धिमत्ता व सद्गुण हीं पाहून राजानें याची जन्मभूमी लू प्रांत याच्या सुभेदारीवर यास नेमिलें. याप्रमाणे राजकीय कामांत शिरल्यामुळे लोकांच्या मनाची स्थिति, राज्याची व्यवस्था, इत्यादि गोष्टींची सुधारणा करण्यास काय केलें पाहिजे याचा बारकाईनें पुरता विचार करण्याची संधि त्यास सहज सांपडली.
 एकंदर देशस्थिति मनांत आणून कनफ्युशस सुधारणा कर- ण्यास प्रवृत्त झाला. त्यानें धर्मसंबंधीं पुष्कळ व्याख्यानें दिलीं. सद्गुण व सद्वर्तन हे त्याच्या व्याख्यानांचे मुख्य विषय असत. हीं व्याख्यानें लोकांस इतकी आवडलीं कीं, थोड्याच काळांत तीन हजार शिष्य त्याचे अनुयायी झाले, आणि त्यानें स्थापित के- लेल्या संप्रदायाप्रमाणे वागूं लागले. लू येथील राजानें याची कीर्ति ऐकुन त्यास मुख्य प्रधान नेमिलें; त्यामुळे कनफ्युरास पु- कळ दिवस राज्यकारभारांत गुंतला होता. असें सांगतात कीं, कनफ्युशस प्रधान होता त्या वेळेस कोणाचें सोनें रस्त्यांत पडलें असले तरी त्यास मालकांशिवाय कोणी हात लावीत नसे. ही अतिशयोक्ति दिसते. कारण, हल्लीं हिंदुस्थानांतील लोक असें ह्मणतात कीं, इंग्रजांच्या राज्यांत काठीला सोनें बांधून जावें. मुसलमानांच्या राज्यांची तुलना करून पाहतां हें अलंकारिक