पान:गद्यरत्नमाला.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०


गद्यरत्नमाला

.

लिहिल्या आहेत, असें दिसतें. कनफ्युशस याच्या ग्रंथावरून जो चिनी लोकांचा प्राचीन इतिहास कळतो तो मात्र विश्वसनीय आहे, असें विद्वान लोकांचे मत आहे. कनफ्युास हा एक सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चीन देशांत महान् तत्ववेत्ता हो- ऊन गेला.
 कनफ्युशसच्या वेळेस चीन देशांत व्यवस्थित राज्यस्थापना होऊन दीडहजारांवर वर्षे झाली होतीं. शेतकी वगेरे निर्वाहास आवश्यक अशा गोष्टी सर्व लोकांस चांगल्या येत होत्या. शेतकरी फार सुखी होते. मांडलिक राजे आपापल्या प्रजेपासून जमिनीचा वगैरे सारा घेऊन बादशहास खंडणी देत. कनफ्युशस याच्या वेळेस, शेतकरी लोक, जमिनीच्या साऱ्याबद्दल शेतांत पिकणारे पदार्थच देत असत. तथापि चीन देशांत पूर्वापासून सोनें, रुपें, तांबे, लोखंड, शिसें वगैरे धातूंची नाणी होतीं असें सांगतात. अलीकडे तांब्यांचे नाणें मात्र प्रचारांत फार आहे. पूर्वी एक प्रकारच्या रुप्याच्या पत्र्याचा व्यवहारांत उपयोग करीत. हा पत्रा घेऊन बाजारांत कांहीं जिन्नस आणण्यास गेलें हाणजे दुकानदार जिनसाच्या किमतीइतका त्याचा तुकडा बेतानें कापून घेई. चिनी लोकांत संख्या मोजण्याचें एक चमत्कारिक यंत्र आहे. त्याचा ते लोक अद्याप व्यवहारांत उपयोग करतात. एका पे- टींत कांहीं तारा बसवून त्यांत निरनिराळ्या रंगाच्या गोट्या ओं- बलेल्या असतात. त्याचे वेगळाले भाग पाडून, पहिल्या भागां- तील गोट्या एकं, दुसन्यांतील दहं याप्रमाणे चिनी लोकांस या यंत्राच्या योगानें भराभर मोजतां येतें. शिनांग बादशहानेंच हैं। यंत्र नवीन सुरू केलें असें हागतात.
 चीन देशांत दुपारच्या वेळी शहरांतून बाजार भरण्याची चाल आहे. शिवाय धान्य वगैरे विकण्याकरितां कायमची दुकानेंहि पुष्कळ असतात. लागवड झालेल्या जमिनीपलीकडे मोठमो- ठाली कुरणे आहेत, त्यांत मेंढ्यांचे कळप चरत असतात. चीन