पान:गद्यरत्नमाला.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीन देशाविषयी थोडी माहिती.

१११

देशांत मोठाली अरण्यें पुष्कळ, व त्यांत व्याघ्रादि हिंसक पशुहि फार आहेत. त्यांस मारण्याकरतां वसंतऋतूमध्ये बडे लोकसुद्धां शिकारीस जातात.
 चीन देशांत शिकारीचें अथवा युद्धाचें मुख्य हत्यार म्हटले ह्मणजे तिरकमटा. यामुळें तीर मारण्यांत तेथील लोक हुशार असतात. तरी त्यांच्या अंगीं युद्धकौशल्य किंवा शिपाईपणा हीं नाहीत. चिनी लोकांस विद्येची अभिरुचि फार आहे. ते शिपा- ईपणापेक्षां विद्येला विशेष मान देतात. त्यांच्या लोकांत, रणांत युद्ध करणान्या वीरापेक्षां शेतांत काम करण्याची विशेष अब्रू आहे. तथापि लहानलहान लढाया नेहमी चाललेल्या असतात. अगदी शांतता अशी देशांत कचित् असते.
 चिनी लोक मुलांच्या विद्याभ्यासाकडे फार लक्ष देतात. प्रत्येक तालुक्यांत एक सार्वजनिक शाळा असली पाहिजे असा त्यांचा कायदा आहे. आठ वर्षांपासून मुलांस विद्या शिकविण्यास तेथे लोक पाठवितात. तेथे लिहिणें, वाचणे, गणित इत्यादि विषय आणि आईबापाशी, गुरूशीं, वडील माणसांशीं, अधिकारी लो- कांशीं, बरोबरीच्यांशी व लहानांशी कसे वागावें, वगैरे गोष्टी शिकवितात. तसे जुन्या ग्रंथांतील उत्तम उत्तम नीतिपर कविता तेथे शिकवितात. नवीन शाळा स्थापन करण्याच्या वेळेस चिनी लोक मोठा थाट करतात. या समारंभाच्या वेळेस प्रांताचा सुभे- दार मुलांला व्याख्यान देऊन गुरूची आज्ञा पालन करणें आणि विद्याभ्यास करणे, इत्यादि गोष्टींचं महत्व यांच्या मनांत पूर्णपणे ठसवून देतो. संपत्ति व प्रतिष्ठा मिळविण्यास चिनी लोकांत विद्येसारखे दुसरे कोणतेंहि साधन नाहीं. पंधरा वर्षाचें वय झाल्यावर बुद्धिमान् मुले असतील त्यांस मोठ्या विद्यालयांत पाठ• वितात. तेथें तीं, कायदे, राज्यनीति इत्यादि विषयांचा अ. भ्यास करतात. या विद्यालयांतले गुरु मोठे विद्वान् असतात. ते राज्यप्रकरणी सर्व माहिती विद्यार्थ्यास करून देतात. या वि