पान:गद्यरत्नमाला.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीन देशाविषयी थोडी माहिती.

१०९

स, लोकांस रेशीम विणण्याचे काम शिकविण्यास सांगितलें अशी कथा आहे. परंतु तिला ही कला कशी आली याविषयीं कोठेहि आधार सांपडत नाहीं, हें चमत्कारिक आहे. होआंग्टी यानेंच अरण्यांत शिकारीस जाण्याकरितां होकायंत्राची कल्पना काढिली असे म्हणतात. ही गोष्ट खरी असो किंवा खोटी असो, तथापि इतकें खरें आहे कीं, चिनी लोकांस होक्याची युक्ति फार प्राचीन काळापासून माहित आहे.
 फोहीच्या वंशांतील शेवटले दोन राजे याऊ व शन, हे सर्व राजांमध्ये फार शहाणे असें मानिलें आहे. चीन देशांतील पुष्कळ कायदेकानू या दोघांनी रचलेले आहेत असें झणतात. शन राज्याच्या वेळेस सर्व चीन देश जलमय झाला होता असें लिहि- लें आहे. यू हा या वेळेस मुख्य प्रधान होता. त्याने मोठ्या चातु पाट काढून पाणी काढून दिले त्यामुळे जमीन पुनः सुपीक झाली. यामुळें यू याची मोठी कीर्ति झाली. तो मोठा गुणवान्हि होता; यामुळे शन बादशहानें, आपल्या मागून यू यानें गादीवर बसावें असें ठरविलें. आपल्या मागून गादीवर बसण्याचा अधिकार राजानें पाहिजे त्यास द्यावा; असा चीन देशांत कायदा आहे.
 मोठा यू याच्या वेळेस यांगत्सेकिआंग या नदीपर्यंत उत्तरेक- डील सर्व प्रदेशांत चीनच्या बादशहाची सत्ता स्थापित झाली. बादशहांनी आपल्या घराण्यांतील पुरुषास पुष्कळ लहान लहान प्रांतांचा अधिकार दिल्यामुळे लहानसान मांडलिक राज्ये पुष्कळ होती. परंतु त्या सर्वोवर बादशाहाचा अधिकार असे. या वेळेस दक्षिण प्रदेशांत थोड्याशा रानटी लोकांची मात्र वस्ती होती.
 मोठा यू याच्या मागून चीन देशांत पुष्कळ राजे झाले. दिवसेंदिवस देशांत वसाहत पुष्कळ होऊन सुधारणा वाढली. या सर्व राजांनी आपापल्या राज्याची वर्णनें विद्वानांकडून लिहवून ठेविली आहेत. परंतु या ग्रंथांत ग्रंथकरयांनीं कल्पित गोष्टी फार