पान:गद्यरत्नमाला.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
गद्यरत्नमाली.


असें मानण्यास बहुत कारणे आहेत, तथापि या दोन्ही राष्ट्रांचे परस्पर दळणवळण होतें किंवा नाहीं हें ठरवितां येत नाहीं. चीन लोकांच्या पुष्कळ रीतीभाती प्राचीन मिसरदेशच्या लोकां- प्रमाणे आहेत. फोही याच्या मागून सात राजे झाले असें चीन लोकांच्या जुन्या ग्रंथांत लिहिलें आहे. या सर्वोस दिव्य ज्ञान होतें. यांनी मूळच्या रानटी लोकांस कलाकौशल्य शिकवून त्यांची सुधारणा केली.
 चीन देशांतील फार व उपयुक्त कला म्हटलें ह्मणजे ह्या दोन होत. एक शेतकी व दुसरी रेशीम विणणे. चिनी लोक पूर्वी- पासून शेतकीवर उपजीवन करतात. त्यांच्या देशांत तुतीचीं झाडें फार असल्यामुळें तेथें रेशमाचे किडे फार, यामुळें चीन देशांत बहुतकरून सर्व कपडे रेशमाचेच असत. एका प्राचीन चीन देशच्या बादशहाच्या राणीनें प्रथम चिनी लोकांस रेशीम विणण्यास व रंगविण्यास शिकविलें असें सांगतात. तसेंच फोही याच्या मागून झालेला राजा शिनांग यानें आरंभी त्यांस शेत- कीचें काम शिकविलें. या उभयतांच्या सन्मानार्थ चिनी लोक अद्याप वार्षिक उत्साह करतात.
 प्राचीन काळापासून आजपर्यंत चिनी लोकांत शेतकीच्या धंद्यास मोठी प्रतिष्ठा आहे. वसंतऋतूमध्ये नवीन वर्षारंभाचा मोठा उत्साह करतात; त्या वेळेस बादशहा स्वतः शेतांत नांगर धरून पेरणी करतो. या कामास चीन देशांतील बहुतकरून कोणताहि राजा आळस करीत नाहीं. यामुळें चीन देशांत शेतक- न्यास मोठा मान मिळतो. एकादा शूर योद्धा अथवा श्रीमान व्यापारी यापेक्षां चिनी लोकांत शेतकऱ्याची मोठी प्रतिष्ठा आहे. लिहिणें, वाद्ये वाजविणें, धातूंचा रस करणे, पूल बांधणे, इत्यादि सर्व कला चिनी लोकांस प्रारंभी बादशहांनी शिकविल्या, अशा कथा चीन देशांत आहेत, पण बादशहा स्वतः कसे शिकले हैं कोठेंहि सांगितलेलें नाहीं. होआंगूटी बादशहाने आपल्या राणी-