पान:गद्यरत्नमाला.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीन देशाविषयाँ थोडी माहिती.

१०७


दिसून येईल कीं, विद्या, चांगले कायदे, व न्यायी सरकार, असल्याशिवाय देशांतील लोकांस सुख होत नाहीं.
 आजपर्यंत सुधारणेसंबंधी चांगल्या ज्या गोष्टी आपण ऐकतों त्या सर्व काकेशन वर्गातल्या लोकांत झाल्या आहेत. सर्व प्रका- रख्या विषयांवर उत्तमोत्तम ग्रंथ त्यांतच आढळतात. तत्त्वज्ञान, राजनीति, धर्म यांचे अनेक प्रकार त्या वर्गात सांपडतात.

चीन देशाविषयी थोडी माहिती.


 चीन देश फार प्राचीन काळापासून सुधारलेला आहे. या देशांत राज्यस्थापना होऊन तीन हजारांवर वर्षे झाली असावीं असा विद्वान लोक सुमार करतात. यापेक्षाहि प्राचीनं काळच्या गोष्टी चिनी लोकांच्या इतिहासांत सांपडतात. परंतु चीन देशां- तील सुद्धां विद्वान लोक त्यांस पौराणिक गोष्टींप्रमाणें कल्पित कादंबऱ्या समजतात.
 प्रथम मध्यएशियाच्या मैदानांतून चीन देशाकडे लोक गेले असावे असा विद्वान लोकांचा अदमास आहे. त्या लोकांनी तार्तरी देशाच्या सीमेवर शेन्सी म्हणून प्रांत आहे, तेथें वसा- हत केली. नंतर ते हळुहळु सर्व चीन देशभर पसरले. या लोकांनी फोही यास आपला राजा केलें; असे चीन लोकांच्या इतिहासांत लिहिले आहे. हा मोठा सद्गुणी होता. यास लोक देवपुत्र' असे म्हणत. हा किताब चीन देशचे राजे अद्याप धारण करतात.
 मोठा यू म्हणून सिस्ती शकापूर्वी सुमारें दोन हजार वर्षांच्या सुमारास चीन देशांत एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. या राजाचा मात्र खरा इतिहास आढळतो. फोही या नांवाचा राजा खराच होऊन गेला असेल तर याच्या वेळेपासून किती काळ गेल्यानंतर, यू राजा झाला हैं बरोबर कळत नाहीं. मिसर देश जेव्हां भरभराटीत होता त्यावेळेस चीनदेशहि सुधारलेला होता