पान:गद्यरत्नमाला.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
गद्यरत्नमाला.


 हे सर्व विद्वानांच्या कल्पनांचे तरंग आहेत. तूर्त आपणांस अनेक ठिकाणी राहून तेथें जुने झालेले लोक दिसतात; याकरितां ते तेथे कोणीकडून आले याचा विचार निश्चित होत नाहीं.
 इतर गोष्टींप्रमाणे मनुष्यांची फार प्राचीनकाळीं काय स्थिति असावी याचा निश्चय करितां येत नाहीं. मनुष्यांच्या वेगळाल्या स्थिति दृष्टीस पडतात, त्यांवरून अर्वाचीन सृष्टितत्त्ववेत्ते, चार स्थितीत मनुष्यें असावी असें अनुमान करतात. १ फलमूलाशी ( फळें मुळें खाऊन राहणारे ). २ व्याध ( पारधीनें उपजीविका करणारे ). ३ धनगर, आणि ४ कृषीवल ( हा० शेतकी करणारे). प्रत्येक देशांतील लोक, पहिल्या स्थितींत असून क्रमाक्रमानें सुधारत एकेक स्थिति टाकून सांप्रतच्या अवस्थेस आले आहेत, असें विद्वान् लोक अनुमान करतात. पण ऐति- हासिक प्रमाण कांहींच सांपडत नाहीं. आपल्या आपण सुधार- लेल्या लोकांची उदाहरणे बहुशः आढळत नाहींत. प्रत्येक देशांत सुधारणा बहुशः बाहेरून येते, व कित्येक रानटी लोक पूर्वी सुधारलेले असून निकृष्टावस्थेत आले असावे असाहि अनु- भव आहे. कितीहि प्राचीन पुस्तकें पाहिली तरी त्या वेळच्या मनुष्यांस नांगर, खोरें, कुदळ, कोयता वगैरे आवश्यक आउ माहित होतीं असें दिसतें. कोठेहि पाहिलें तरी शेतकी पहिल्यापासूनच आहे असें दिसतें. मनुष्यें पशुस्थितींत होतीं अशी कल्पना करोत, पण कितीहि मागें विचार करीत गेलें तरी मनुष्ये समुदायानें राहणारी, मालमत्ता बाळगणारी व लहा नसाहान कायदे अथवा नियम व सरकार यांच्या अमलांत वागणारींच आढळतात. त्यांच्याहि पूर्वी कर्धी मनुष्यें कंद- मूळावर उपजीविका करून स्वतःचें रक्षण करून रहात असतील अमेंहि अनुमान करितां येईल; तथापि फार प्राचीन काळा- पासून सुधारणा होऊन मनुष्यें शेतकी करूं लागलीं, आणि देशांत मोठमोठाली राज्ये उत्पन्न झाली. एकंदर इतिहासावरून