पान:गद्यरत्नमाला.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन इतिहास.

१०५

आहेत. पहिला काकेशिअन, दुसरा मांगोल आणि तिसरा नियो. आशियाखंडांतील काकेशस पर्वतापासून गंगानदीपर्यंत जो प्रदेश आहे त्या प्रदेशांतील लोक, यूरोपांतील लोक, आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडील लोक इतके पहिल्या वर्गात आहेत असें मानतात. आशियाखंडाच्या पूर्वेकडील लोक व अमेरिकेतील लोक दुसऱ्या वर्गात गणिले जातात. आफ्रिकेतील काळ्या रंगाचे व राठ केसांचे लोकांचा तिसरा वर्ग समजतात. कित्येक जाति अशा आढळतात की, वर सांगितलेल्या तीन वर्गीपैकी कोणत्याच वर्गात त्यांची गणना करितां येत नाहीं. प्राणी व वनस्पति यांप्र मागें मनुष्यांमध्येहि अनेक तन्हा आढळतात.
 मनुष्याच्या उत्पत्तीचा जसा थांग लागणें नाहीं, तसा मनुष्यें पूर्वी पृथ्वीच्या कोणत्या प्रदेशांत रहात होतीं याचाहि शोध लागणे कठीण पडते. प्रत्येक धर्मशास्त्रांत वेगळाली स्थानें सांगि- तली आहेत. आपल्या पुराणप्रसिद्ध ऋषींचे आश्रम, व पुरातन राजांची राज्ये आर्यावर्तत म्हणजे हिमालय आणि विंध्य पर्व- तांच्या मधल्या प्रदेशांत होतीं, म्हणूनच या प्रदेशास आर्यावर्त हें नांव प्राप्त झालें आहे, तथापि मूलस्थान अमुकच असें निश्व- यात्मक ठरवितां येत नाहीं. इतर धर्मपुस्तकांतहि तीं जेथें जेथें प्रवृत्त झालीं तेथील आसपासच्या प्रदेशांत मनुष्यांचीं मूलस्थानें सांगितलीं आहेत.
 अलीकडील विद्वानांनीं मनुष्यांचीं मूलस्थानें तीन मानिली आहेत. काकेशन वर्गातलीं मनुष्यें, काळ्या समुद्रापासून हिंदु- स्थानाच्या पूर्व बाजूपर्यंत जो प्रदेश आहे, त्यांत होतीं असें म्हण- तात. दुसऱ्या वर्गातील लोकांचे पूर्वज पूर्वेकडे तिबेटाच्या पलि- कडे कोबी नांवाच्या मैदानाच्या जवळच्या पर्वतांत होते. आणि आफ्रिकेतील चंद्रपर्वताजवळ प्राचीन निग्रो लोक रहात होते, असें अनुमान करतात. अमेरिकाखंड फार दिवस ओसाडच असावें असें मानिले आहे.