पान:गद्यरत्नमाला.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
गद्यरत्नमाला.


आहेत. अशी अदलाबद्दल आजपर्यंत किती वेळ किती ठिकाण झाली असेल हैं कोण सांगेल ?
 मनुष्याच्या उत्पत्तीचा विचार केला तरी, त्याचा कांहींच ठि- काण लागत नाहीं, अशी व्यवस्था होते. प्रत्येक धर्माच्या पुस्त- कांत वेगवेगळी उत्पत्तीची रीति सांगितली आहे. त्यामुळे सर्वोची एकवाक्यता होत नाहीं. कोणी ह्मणतात पंचमहाभूतां- पासून सृष्टि उत्पन्न झाली. कोणी ह्मणतात प्रथम स्त्रीपुरुषांचा जोडा ईश्वरानें उत्पन्न केला. या सर्वोची एकवाक्यता न होतां उत्पत्तींच्या रीतीचा निश्चय करण्यास कठीण पडतें. तथापि प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक देशांतील अनेक विद्वानांनी प्राचीन उत्पत्तीच्या रीतीचें अनुमान करण्यास पुष्कळ यत्न केले आहेत, यांपैकी कित्येकांचे विचार फार सूक्ष्म व मनोरम आहेत.
 उत्पत्तीचा प्रकार कांहीं असो, ईश्वरानें जगांत मनुष्यें उत्पन्न केलीं असें मानून चाललो तरी अनेक प्रश्न उत्पन्न होतात. का- रण पृथ्वींतील सर्व मनुध्यें पाहिली तर एकसारखी दिसत नाहींत. परस्परांच्या शरीररचनेंत थोडाबहुत भेद दृष्टीस पडतो. तसेंच बुद्धीविषयीं विचार केला तरी वेगळाल्या जातींत अतिशय भेद आहे. पहिल्याने मनुष्यें सारखी असून पश्चात् हवेच्या वगैरे बाह्य कारणांनी त्यांच्या बांध्यांत व बुद्धींत अंतर पडले याचा निश्चय करितां येत नाहीं. हिंदु, युरोपियन वगैरे जाती पाहिल्या तर बुद्धीविषयीं फारच श्रेष्ठ आहेत. तसेच अमेरिकेतील मूळचे लोक अगदी पशुतुल्य असतात. कोणी तत्ववेत्ते ह्मणतात कीं, प्रथम मनुष्यें सर्वं चांगलीं होतीं पण कांहीं बाह्य योगानें, त्यांस अशी पशुतुल्यावस्था प्राप्त झाली असावी. कांहचिं ह्मणणें असें आहे कीं, सर्व मनुष्यें अमेरिकेतील मुळच्या लोकांसारखींच होतीं. पण कित्येक सुधारून बुद्धिमान झाली. दोन्हीं अनुमानें संभाव्य दिसतात, पण अमुकच खरें असा निश्चय होणें नाहीं.
 अर्वाचीन तत्त्ववेत्यांनीं पृथ्वींतील सर्व मनुष्यांचे तीन वर्ग केले