पान:गद्यरत्नमाला.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन इतिहास.

१०३


सुधारणा नाहीं, तेथील लोक बहुशः जग वर्तमान कालीं आहे तसेंच अनादिकालापासून आहे व पुढेहि असेंच राहणार असें मानीत असतात. पण लोक विद्या शिकून शहाणे झाले, आणि सृष्टीचा विचार करूं लागले ह्मणजे मनुष्याच्या जन्मास आ- ल्यापासून जशा दररोज स्थिति बदलतात, तशी जग ही एक ईश्वराची सतत बदलणारी वस्तु आहे, असें त्यांस स्पष्ट दिसतें. आलीकडे सुधारणा होऊन इतिहासाकडे लोकांचे मन लागल्या- पासून, जगाच्या सुधारणेच्या कामांत नेहमीं पुढे पाय आहे, हें आबालवृद्धांस कळत चालले आहे. याकरतां पृथ्वी कशी उत्पन्न झाली, तिची पूर्वस्थिति कशी असावी, याचा शोध करण्याकडे हल्लीं पुष्कळ विद्वानांचें मन लागले आहे. पृथ्वीचा आकार नारिंगासारखा असावा असें हल्लीं सर्व पृथ्वींतील विद्वानांचे मत आहे. नारिंगासारखा दोहों ध्रुवांकडे पृथ्वीचा आकार चपटा असण्याचें कारण विद्वान् लोक असें सांगतात कीं, पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हां हल्लीप्रमाणें घनीभूत हाणजे घट्ट नव्हती, तर लो- ण्याच्या गोळ्याप्रमाणे लवलवीत असल्यामुळे तिला गति प्राप्त झाल्याबरोबर मध्ये मोठी होऊन दोहों बाजूंस चापट झाली. प्राचीन काळी सुधारलेल्या देशांतील ज्योतिषी पृथ्वी स्थिर, व सपाट आहे, असें मानीत होते; परंतु सांप्रत सर्व पृथ्वींतील ज्योतिःशास्त्रवेत्यांचा वर सांगितल्याप्रमाणें निश्चय झाला आहे.
 अशा गोष्टींचे ज्ञान पृथ्वीवरील मनुष्यांस प्रत्यक्ष होणें नाहीं, हें तर सिद्धच आहे, तथापि पूर्वीपेक्षां नूतन अनुमानें पुष्कळ अंशीं खरीं ह्मणण्यास बहुत आधार आहेत. पृथ्वीचा वर्तुलाकार कायम आहे तरी तिच्या बाह्यस्वरूपांत नेहमीं अन्तर पडतें ! हें भूगोलशास्त्रवेत्यांच्या अनुभवास आले आहे. जेथें पूर्वी मोठमोठीं नगरें होत तेथे हल्ली जंगलें वाहून नद्या, ओढे व अरण्ये झालीं आहेत व जेथें मनुष्यांची गति देखील नसे व सिंहव्या घादि हिंसक पशु संचार करीत, तेथें हल्लीं मोठमोठी शहरें झालीं