पान:गद्यरत्नमाला.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शकुंतलेची गोष्ट

९५


शकुंतला - मी आज दुष्यंत राजा पति वरिला, तर त्याचें व त्याच्या इष्टमित्रांचें सर्वदा कल्याण असो, एवढाच वर मागतें. कण्व -मुली, तुजकरतां माझी त्याजवर पूर्ण कृपा आहे. जें जें तूं इच्छितेस तें तें सर्व होईल.
 नंतर कांहीं दिवसांनी शकुंतला प्रसूत झाली. तिला अति सुंदर रूपवान् पुत्र झाला. कण्वऋषीनें दुष्यंताच्या मुलाचे सर्व जातकर्मादि संस्कार केले. मुलगा फार भराभर बाहूं लागला, तेव्हां अतिशय बलाढ्य व अधिकाधिक सुंदर दिसूं लागला. सर्व राजचिन्हें त्याच्या अंगावर होती. सहा वर्षांचा झाला नाहीं तोंच सिंह, वाघ, हत्ती, वगैरे मोठाल्या पशूंस झाडाशी बांधूं लागला. सर्वोस दमवणारा म्हणून ऋषींनी त्याचे नाम 'सर्वदमन' ठेविलें. मुलगा किंचित् वयांत आल्यावर त्याचें अलौकिक शहाणपण पाहून, हा राज्यकारभार करण्यास योग्य झाला असें कण्वानें शकुंतलेस सांगितलें आणि शिष्यांस आज्ञा केली कीं आतां शकुंतलेस नवऱ्याचे घरीं पोहोंचती करा. बायकांनी फार दिवस बापाच्या घरीं राहणें ठीक नाहीं, त्यापासून दुष्कीर्ति, दुर्वर्तन, अधर्म हीं होण्याचा संभव असतो.
 याप्रमाणें ऋचिं भाषण ऐकून शिष्य शकुंतलेस पोहोंचवि- ण्यास तयार झाले. शकुंतलाद्दि मुलास घेऊन त्यावरोवर नि- घाली. नगगंत गेल्यावर, राजास वर्दी दिली. राजाच्या आज्ञेनें सर्वांनी राजवाड्यांत प्रवेश केला. राजानें चालीप्रमाणे सत्कार केल्यावर शिष्य शकुंतलेस तेथे ठेवून परत गेले, तेव्हां शकुंतला राजास म्हणते, राजा, कण्वाश्रमी येऊन पूर्वी त्वां मजबरोबर गांधर्वविवाह केला, त्याचें स्मरण तुला आहेच. तुजपासून मला हा पुत्र झाला आहे, तर याचा स्वीकार करून पूर्वीच्या नियमाप्र माणे यास राज्यकारभार सांगून त्वां हा आपल्या मागें गादीचा मालक करावा.
 हे ऐकून राजास स्मरण असतांहि आपणांस हैं कांहीं माहीत