पान:गद्यरत्नमाला.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
गद्यरत्नमाला.


नाहीं. असें दाखवून म्हणतो, हे दुष्टे, तपस्व्याची मुलगी तूं कोण ? तुजशी कोणत्याहि प्रकारचा संबंध केलेला मला स्मरत नाहीं. रहा, जा यथेच्छ तुला पाहिजे तें कर.
 राजाचें भाषण ऐकून शकुंतला दुःखानें मूर्च्छित पडली. रागानें तिचे डोळे लाल झाले. रागानें राजाकडे पाहून त्यास ती म्हणाली, ' महाराज ' आपणास सर्व ठाऊक असून, अशा- न्यासारखें कांहीं आठवत नाहीं असें कां म्हणतां ? याविषयीं तुमच्या अंतःकरणास माहीत आहे, त्याचीच साक्ष घ्या. जो सत्य स्मरून त्याचा अपलाप करितो, त्या चोरानें कोणतें पाप केलें नाहीं ? आपण मोठे ज्ञानी म्हणवितां, पण सर्वांतर्यामी परमेश्वर तुमच्या हृदयांत आहे त्याच्या समक्ष पाप करण्यास तुम्हास को शंका वाटत नाहीं ? मनुष्य मी गुप्तपणें काम करितों हें कोणास समजणार नाहीं असें मानितो; परंतु सूर्य, चंद्र, पृथ्वी, वायु, अनि हत्यादि त्याचे कृत्य पाहणारे पुष्कळ आहेत. हृदयस्थ परमेश्वर संतुष्ट असला म्हणजे मनुष्यांची सर्व पातकें नष्ट होतात, तोच संतुष्ट नसला छाणजे महायातना भोगाव्या लागतात. आपण होउन मी तुजकडे आलें एवढ्यावरूनच तूं माझा अप- मान करू नको. मी येथें एकटी रडतें याची तुला करुणा येत नाहीं. काय ? मी इतकी याचना करत असतां तूं ऐकणार नाहीं. आज तुझें कपाळ फुटलें समज. पति स्त्रीच्या उदरांत पुत्ररूपानें आपणासच पुनः उत्पन्न करतो. याकरतां तिला मोठमोठे प्राचीन विद्वान् 'जाया' असें म्हणतात. तसेंच पुन्नामक नरकापा- सून पूर्वजांचें त्राण (रक्षण) करतो, म्हणून मुलास पुत्र असें म्हणतात. जी गृहकृत्याविषयीं दक्ष, जिला मुलें होतात, जी नवन्यास प्राणापलीकडे समजते, जी पतिव्रता तिलाच बायको म्हणावें. बायको ही पुरूषाचें अर्धाग आहे. बायकोसारखा खरा मित्र दुसरा कोणी नाहीं. धर्म, अर्थ, काम, हे तीन पुरुषार्थ प्राप्त होण्यास भार्याच कारण आहे. ज्यांस भार्या असते त्यांसच गृहस्थाश्रमाच्या