पान:गणेश चतुर्थी.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या एका दांताविषयींची गोष्ट पाहा. शिव पार्वती एकांतीं असतां त्यांनीं गणोबाला द्वार रक्षणार्थ ठेविलें होतें, इतक्यांत परशरामाची स्वारी शिवदर्शनास आली व त्याला गणपतीने आंत जाण्याचा प्रतिबंध केला, ह्मणून परशरामाने बुकी मारून त्याचा एक दांत पा- डला. अहो, ज्याला तुह्मी विनायक व विघ्नहर्त्ता ह्मण- तां त्याला आपणावर आलेली ही दोन विघ्न निवारण करितां आलीं नाहींत, तो तुमचीं विघ्ने कशी दूर क रील ? मित्रहो, विचार करा.

 गणेशचतुर्थीच्या दिवशीं तह्मी चंद्रदर्शन घेत नाहीं, कारण तसे केल्यानें तुलावर चोरीचा आळ येईल असा चंद्रास गणपतीचा श्राप आहे असे तुह्मी ह्मणतां, पण असे पाहा कीं, तुमच्याशिवाय शेकडो व हजारो लोक त्या दिवशी चंद्राला पाहतात त्यांजवर कधीं असा आ- ळ येत नाहीं. तेव्हां ही गोष्ट कशी खरी मानावी ?

 गणपतीला कांहीं दिवस घरांत ठेविल्यावर तुझी त्याला बाहेर नेऊन पाण्यांत टाकतां, हे एक त्या विघ्न- हर्त्यांवर विघ्नच नव्हे काय ? आणि तुझाला याची गरज नाहीं काय ? गणपती बुडाल्यावर तुमचीं विघ्ने कोण हरण करील ? हा पोरखेळ नव्हे काय ? बाव्हला