पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सडका समाज.

“स्वप्रियं तु परित्यज्य यल्लोकहितं भवेत् ” ह्या नियमाला अनुसरून वागणारे हातावरच्या बोटांएवढ तरी देशी अधिकारीवर्गांत आढळतील काय ? सार्वजनिक कल्याणाच्या मिषानें वर्गणी गोळा करून त्यावर कारखाना उभा- रून ज्यानें आपली तुंबडी भरली नाहीं असा एकादा देवमाणूस कोणाच्या अवलोकनांत आला आहे काय ? फसवण्याची संधि मिळाली असून ज्यानें दुसऱ्याला फसवलें नाहीं, असा एकादा साळसूद कोणाच्या परिचयाचा आहे काय ? लोकहिताला आग लागो, पण आपला व्यवहार न्यायानें व सरळपणाने करणारा कोणी हरीचा लाल असलाच तर देवळांत जाण्या- ऐवजी त्याचेच प्रत्यहीं पाय धरण्याची वेळ आली नाहीं काय ? सारांश, शिक्षणाचा आमच्यावर कांहीं एक परिणाम झाल्याचीं चिन्हें दिसत नाहींत. विधवा स्त्रियांना मुली आहेत एवढ्याच सबबीवर त्यांच्याजवळ हजारों रुपये हुंडा मागणाऱ्या आमच्यांतील असंख्य सुशिक्षितांची पायरी दरोडेखोरांच्यावर खास लागणार नाहीं. आमची नीतितत्वेंच साफ बद- ललीं आहेत. व्यापारांत फसवणें पाप नव्हे. कोर्टात खोटें बोलणें दोषा- स्पद नाहीं. गतभर्तृका भावजयला लुबाडणें हा व्यवहारच आहे. ही नीति सध्यां शिष्टसंमत झाली आहे. प्रजासत्ताक राज्यांत इतर राष्ट्रांवर आपली छाप बसावी म्हणून आपल्या प्रजेचें शरीरवल, नीतिबल व बुद्धि- बल वाढवणें हे राजाचें कर्तव्यच होते. पण बेबंद सरकारापुढें हें ध्येय असणें संभवनीय नाहीं. प्रजेला गोगलगाय बनविण्याचेंच प्रयत्न ह्या सत्ते- खालीं केलें जाणें स्वाभाविक आहे. ह्या धोरणाच्या विरुद्ध जाणाऱ्याच्या वाटेला हाल अपेष्टा ठेवलेल्या. “ अभिभूतोऽप्यवज्ञातो यो राज्ञां द्वारि तिष्ठति । स तु राज्ञां श्रियं भुङ्क्ते नाभिमानी कदाचन. "




८७