पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

धार्मिक बाबींचा निकाल कोर्टातून होणार नाहीं असें ठरवलें म्हणजे धर्माचा आपोआप -हास होतो. खुला व्यापार ठेवला म्हणजे मनुष्य उपाशीं मरतो. अशा रीतीनें कोणत्याहि सरकाराला प्रजेस आपल्या लगामीं निरंतर ठेवितां येतें. एवढ्याकरतां राजकीय सुधारणा अगोदर घडवून आणल्या पाहिजेत, हें उघड आहे. सामाजिक सुधारणा झाल्यावांचून राजकीय सुधारणा निरुपयोगी, असें म्हणणारे कार्यकारणाचा विपर्यास करतात. मनुष्याच्या जीवनाला विशिष्ट स्वरूप देण्याच्या कामी राजसंस्थांत किती सामर्थ्य असतें, ह्याची कल्पनाहि पुष्कळांस नसते. राजकीय सुधारणा साध्य नव्हे, साधन आहे. इतकेंच नव्हे तर ते प्रमुख व आद्य असें साधन आहे. तशांत देशाच्या अवनतीमुळे राज्यसत्ता निरंकुश झाली, म्हणजे तर राजकीय सुधारणा विशेषच निकडीची होते.
 निरंकुश सत्ता ही केव्हांहि झालें तरी अनिष्टकारकच होते. ह्या सत्तेखाली नीतीचें वर्धन होत नाहीं, शील बनत नाहीं, ओज राहात नाहीं, कोणत्याहि खऱ्या सुधारणेचें बीज रुजत नाहीं, असन्मताची छाप सर्वत्र बसते. राष्ट्र विस्कळित होतें; अयोग्य माणसें पुढें येतात; सद्गुण जागच्या- जागींच जिरून जातात; दारिद्र्य घर करून बसतें; अनामय कोणाच्या वांट्याला लाभत नाहीं; आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे अशी स्थिति होते असें कोणाच्या लक्षांतहि येत नाहीं. परमेश्वराच्या मायाजालापेक्षांहि हें मायाजाल कठणि. परमेश्वरी माया सांत आहे, पण ही नरेश्वरी माया सादि असून असून अनंत दिसते. पण दोहोंमध्यें एक साम्य आहे की, ह्या दोन्ही हि मायांच्या मायावीपणांतच प्रत्येकास सुख वाटत असतें. “The greatest evil of slavery is that the slave does not feel that he is a slave.” गुलामाला मी गुलाम आहे असें वाटत नाहीं हाच गुलाम- गिरीतला मोठा दोष होय. निरंकुश सत्ता बिनधास्त राखण्यास देशांत शांतता ठेवणें भाग असतें. त्याचा फायदा प्रजेस मिळतो. ह्याव्यतिरिक्त

८४