पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उधळे युग.

दोन मैलाच्या आंत गांव असला तरी गाडी केलीच पाहिजे पायी. जाण्यांत हलकेपणा वाटू लागला आहे. एक दोन मैलांकरितां आठ' आणे फेंकून देण्यास कोणीहि कचरत नाहीं, ह्यावरून पैशाचा वाता आम्ही ओळखत नाहीं, असें सिद्ध होतें. वाहनांचा उपयोग निकडीच्या कामाकरितां आणि दुखणेकऱ्याकरितां आहे. बाकीच्यांनी निष्कारण वाहनें वापरणें म्हणजे सामाजिक पाप करणे होय. ठाणे, कल्याण, पुणे, सोला- पूर, धुळें वगैरे स्टेशनांवर जाऊन मौज पहा म्हणजे आमच्या लोकांची विवेकभ्रष्टता चांगली निदर्शनास येईल. सकाळ असो, संध्याकाळ असो, धडधाकट, तरणेताठे पुरुष चटकन् गाडीत बसून घरचा रस्ता धरतात. खरें म्हटलें तर स्त्रियांनी सुद्धां अशा ठिकाणी चालत जाण्यास हरकत नाहीं. असल्या ह्या चंदुलालपणाची चटक लागली म्हणजे मनुष्यांत कंट- कपणा येत नाहीं, व मग कोणत्याहि रोगाला थारा मिळणे कठीण जात नाही. पण असल्या नादानपणाच्या कृत्यांतच आपण भूषण मानीत आहों.
 लोकांचीं आपणांस श्रीमंत समजावें ही बलवत्तर व घातुक वासना सांप्रत प्रत्येकांत उद्भूत झाली आहे. ह्या वासनेचा उगम दारिद्र्यांत आहे, हें उघड आहे. दरिद्री लोकांनाच श्रीमंत दिसण्याची हौस फार. ह्या औद्योगिक युगांत नसत्या श्रीमंतीचें सोंग करणेंहि किफायतशीर होते. ह्या कारणानेंच उधळेपणाची प्रवृत्ति वाढत्या प्रमाणावर दिसून येते. तसेंच चालू पिढीची माणसें वाऱ्याच्या झुळकीनेंहि डुलणारी आहेत. त्यांच्यांत मनाचा ताठरपणा नाहीं. पूर्वीच्या माणसांत हा गुण प्रामुख्याने वसत होता. कोणाच्याहि हांसण्याला अगर निंदेला ते जुमानणारे नव्हते. पण लोक काय म्हणतील हा बागुलबोवा आह्मांस आमच्या इच्छेप्रमाणे वागूं देत नाहीं, असें सध्यां झालें आहे. आणखी असें कीं, घरांत पूर्वी यज- मानाचा करडा अंमल जितका होता तितका सध्याच्या व्यक्तिस्वातं- त्र्याच्या दिवसांत राहिला नाहीं. पूर्वीचा अधिकार आतां डळमळला

८१.