पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

जवळ तोंड · बेंगडावें लागतें म्हणूनच सर्व पैसे खर्च न करतां कांहीं शिल्लक ठेवणें अपरिहार्य आहे. आवश्यक खर्चाकरितां लागणारे व कार- णपरत्वें लागणारे पैसे वगळून बाकीच्या पैशाचा विनियोग प्रम सुखसोयींचीं साधनें निर्माण करण्याकडे करण्यास प्रत्यवाय नाहीं. ज्या वस्तूपासून आपणांस अल्पांशानेंच सुख मिळतें त्या वस्तूंत पैसे दवडणें मूर्खपणाचे आहे. ह्या दृष्टीने पाहातां कपड्यालत्त्यांत हल्लीं फाजील खर्च होतो असेंच म्हणावें लागतें. दोन डझन शर्ट, दोन डझन कोट, अर्धा डझनवू अशा रीतीनें जिन्नस करण्यांत अगर विकत घेण्यांत आपणांस सुखाचें प्रमाण किती लाधतें ? फार काय, पण आवश्यक व अल्पावश्यक ह्यांतील फरकच तरुण वृद्धांना सध्यां समजत नाहीं असें म्हणण्यांत यत्किंचितह अतिशयोक्ति नाहीं.
 वर सांगितल्याप्रमाणें जे लोक खर्च करितात त्यांच्या घरांत प्रत्येक माणसाला निदान पावशेर तरी दूध पिण्यास मिळतें काय ? कपड्या- लत्त्यांचें पोरकट वेड महात्मा गांधींनीं नाहींसें केलें ह्याबद्दल त्यांचें धन्य- वाद गावे तेवढे थोडेच होतील. अनावश्यक पदार्थांचा संग्रह करण्यानें किंमती वाढतात व ती गोष्ट गरीबांना नाहक जाचक होते, ही साधी गोष्ट आमच्या सुशिक्षितांना कशी समजत नाहीं ? शहरांत कोणाच्याहि घरीं जा, अनावश्यक पदार्थांची रेलचेल आणि आवश्यक पदार्थांची कोताई, असाच आपणांस अनुभव येईल. डझनावारी वूट बाळगणाऱ्या थोर सुशिक्षितांस, त्यांच्या संग्रहीं एकहि पुस्तक नसलें, तर त्याची मात्र लज्जा वाटत नाहीं. विश्वविद्यालयांत ' फेलोज' म्हणून नेमणूक करण्या- पूर्वी त्या विद्योपासकांच्या संग्रहाला किती ग्रंथ आहेत ह्याची चौकशी सरकारनें करावी, अशी एक सूचना आमच्यापैकी एकानें केली, ती मन- नीय नाहीं काय ? कारण नसतांना पदार्थ वापरणें, म्हणजे जगांतील उत्पादनशक्तीचा आपण दुरुपयोग करतों, असें होतें. स्टेशनपासून एक